राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
मौजा भटेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शासकीय केंद्र शासन पुरस्कृत आयोजीत कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोहनभाऊ पुराम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आतापासूनच सुरू करावे.
ते पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की,मराठवाडा आणि कोकणातील विद्यार्थी मेहनत करून कष्टाने व अभ्यासाने मोठे होतात आणि गडचिरोली जिल्हामध्ये येऊन उच्च पदावर कार्यरत असतात.
त्याप्रमाणे आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवणे ही आपली जबाबदारी आहे,गुरुजी आणि पालकांची जबाबदारी आहे हे भान असायला पाहिजे.
तरच खऱ्या अर्थाने गावातील गल्ली गोळातील विद्यार्थी उच्च पदावर येऊन समाजाचा आणि गावचा विकास करतील तरच आपला गाव सक्षम आणि समृद्ध होईल.अन्यथा आपला समाज आणि आपले मुले मागे पडतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे मोहनभाऊ पुराम यांनी मनोगतात म्हटले.
या बैठकीत मुख्याध्यापक गुरनुले सर,पोलिस पाटील रेशमाताई पुराम,पोष्ट ऑफिस अधिकारी मैलारे मॅडम,गायकवाड मॅडम, अंगणवाडी सेविका किरणताई पुराम उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन वाकडे सर यांनी केले.



