Home Political आदिवासी महिला आघाडीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी माधूरीताई कोरवते यांची नियुक्ती…. — अखील...

आदिवासी महिला आघाडीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी माधूरीताई कोरवते यांची नियुक्ती…. — अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी केली नियुक्ती….

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

      अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आदिवासी महिला आघाडीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी माधूरीताई मिलींद कोरवते यांची नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी केली.

         अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने सौ.माधूरीताई मिलींद कोरवते यांना संबंधित क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे.

        त्या अनुभवातून उत्तम समाजसेवा घडावी आणि अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाला गडचिरोली जिल्ह्यात बळकटी मिळावी यासाठी माधूरीताई मिलींद कोरवते यांची आदिवासी महिला आघाडीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी दिनांक १३ मार्च २०२६ रोज शुक्रवारला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रोहिदास राऊत यांनी नियुक्ती केली.

      सदर नियुक्तीचे पत्र सौ.माधूरीताई मिलींद कोरवते यांना देण्यात आले आहे.तद्वतच त्यांना भावी काळातंर्गत योग्य कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.