राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कला गुण हे फक्त आनंद मनोरंजनाचेच माध्यम नाही तर आपल्या अंगी असलेल्या कलेची जोपासणा केल्यास त्या माध्यमाने उपजिवेकेचे साधन मिळत आपले ध्येय साध्य करने शक्य आहे म्हणून आपल्या कलेला व्यवसायाचे स्वरूप द्या असे आवाहन पद्मश्री डॉ.परशूराम खूणे यांनी केले.
स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शहर विचार मंचाचे संयोजक माधवदास निरंकारी, उपप्राचार्य पी. एस .खोपे , उपप्राचार्य डॉ. अभय साळुंखे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संजय महाजन ,विद्यार्थी प्रतिनिधी राकेश उईके, सांस्कृतिक विभाग प्रमुख वैभव दखणे , उपस्थित होते.
बक्षीस वितरण कार्यक्रमात सन २०२४/२५ या शैक्षणिक सत्रातील महाविद्यालयातील विद्यापीठातून गुणवत्ता यादीत आलेले, विद्यापीठ ,आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धक, गांधी विचार संस्कार परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचा सांस्कृतिक स्पर्धेत संगीत, गायन, नृत्य, रांगोळी, पोस्टर प्रदर्शन, आनंद मेला स्पर्धा व राष्ट्रीय सेवा योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणार्या, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र ,शील्ड देऊन तसेच महाविद्यालयाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार प्रदान करीत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अहवाल वाचन व प्रास्ताविक डॉ.संजय महाजन,संचालन मयुरी सहारे व प्रा.डॉ. रवींद्र विखार,आभार प्रा. तृप्ता वाकडे यांनी मानले.



