Home उपक्रम कुरखेडा येथे तालुकास्तरीय व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात….

कुरखेडा येथे तालुकास्तरीय व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात….

      राकेश चव्हाण

  कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

       विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाची जाणीव निर्माण करून स्वालंबनाकडे वाटचाल घडवून आणण्याचे उद्देशाने तालुकास्तरीय व्यावसायिक प्रशिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचा पार पडला कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी कोकोडे साहेब ,गटशिक्षणाधिकारी शिवणकर साहेब,समुपदेशक निवृत्त मुख्याध्यापक खूने सर , निलकुंटीवार सर, तथा विशेष मार्गदर्शन पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ साहेब, प्रा. रजनी आरेकर मॅडम मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळात कौशल्यआधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून देत रोजगाराच्या संधीसाठी उद्योजकता हा प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले. 

        या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना लघु उद्योग सुरू करण्याच्या पद्धती व्यवसाय, व्यवस्थापन आर्थिक नियोजन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तज्ञांनी विद्यार्थ्यांना पारंपारिक नोकरीच्या चौकटी बाहेर विचार करून स्वतःच्या व्यवसाय उभारण्याच्या धाडस दाखवण्याचे आवाहन केले व मुला मुलींच्या सुरक्षितेबद्दल माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातून उपयुक्त मार्गदर्शन मिळणारे सांगितले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक बद्दलची नक्कीच उत्सुकता निर्माण होईल असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

       या प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून प्रा. उमा चंदेल प्रा.सुनीता मस्के यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी हेमंत सपाटे सर, पटले सर,गजभिये सर यांनी विशेष सहकार्य केले.

         या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक लोकांनी सहभाग आणि सहकार्य दिले.