रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर/- गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या द्वारे 08 मार्च ला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ हरेश गजभिये होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांत कायदेविषयक जनजागृती झाली पाहिजे. समाजात यथोचित मान- सन्मान व्हायला हवा. कार्यकारी प्राचार्य डॉ प्रफुल्ल बन्सोड यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
प्रा डॉ कार्तिक पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात वर्तमान काळातील महिलांचा कर्तृत्वाचा आलेख उंच आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व समाजानी एकत्र आले पाहिजे. सूत्रसंचालन कु हर्षाली कडवे,प्रास्ताविक रासेयो विभागीय समन्वयक डॉ प्रफुल राजुरवाडे यांनी केले.
आभार कु मंजुषा रामटेके हीने केले. कार्यक्रमाला प्रा. रुपाली बरडे प्रा. शितल वानखेडे प्रा. वर्षा सोनटक्के प्रा.रिना भोयर प्रा. तुराणकर मंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग होता.



