Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — गॅस सिलेंडर दरवाढीसह तुटवड्याच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाद्वारे...

ब्रेकिंग न्यूज… — गॅस सिलेंडर दरवाढीसह तुटवड्याच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाद्वारे भारत सरकारचा निषेध… — गॅस सिलेंडर बुकिंग कालावधी कमी करण्यासाठी व दरवाढ कमी करण्यासाठी केले चिमूर तहसील कार्यालयाच्या पुढे आंदोलन…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

      ६० रुपये प्रती गॅस सिलेंडर वाढविण्याच्या विरोधात आणि गॅस सिलेंडर बुकिंग कालावधी वाढविण्याच्या विरोधात,चिमूर तहसील कार्यालयाच्या पुढे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या द्वारे भाजप प्रणित भारत सरकारचा जोरदार जाहीर निषेध करण्यात आला…

          महागाईने जनता होरपळून निघत असतानाच परत भाजपा प्रणित भारत सरकारने प्रती गॅस सिलेंडर ६० रुपये वाढवले आहे.

        याचबरोबर गॅस सिलेंडर बुकिंग कालावधी वाढवला आहे.याचा फटका भारत देशातील सर्व नागरिकांना,व्येवसायीकांना बसला आहे.यामुळे गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचे हाल होणे सुरु झाले आहे.

              चिमूर विधानसभा मतदारसंघासह भारत देशातील नागरिकांचे गॅस सिलेंडर महागाईमुळे आणि गॅस सिलेंडर बुकिंगच्या दिर्घ कालावधीमुळे हाल होऊ नये म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे द्वारा आज भाजप प्रणित भारत सरकारचा जोरदार जाहीर निषेध करण्यात आला.

        यानंतर तहसीलदार श्रिधर राजमाने यांचे द्वारे भारत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

        निषेध आंदोलनात श्री.धनराज मुंगले ओबीसी संघटक महाराष्ट्र प्रदेश,श्री.विजय गावंडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी,गजानन बुटके महासचिव चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी,जुनेद खान जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता,प्रदीप भाऊ तळवेकर अध्यक्ष तालुका पर्यावरण सेल,राजू लोणारे संघटक तालुका ओबीसी,नागेंद्र चट्टे अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस,शांताराम शेलवाटकर सर्कल प्रमुख,चौधरी सर्कल प्रमुख,इरफान पठाण नगरसेवक चिमूर,रत्नाकर विटाळे,गौतम पाटील,संदीप कावरे,गुरु जुनघरे,नानक सिंग,दिलीप गंधारे,देवाजी मुंगले,गणेश कारेकर,शम्मी भाई,सुनील बोरकर,विजय मातकरे,सुभाष करारे,लाटारु सूर्यवंशी यांच्यासह अनेक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध आंदोलनात सहभागी झाले होते….