शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
प्रत्येक स्त्रीच्या कर्तुत्वचा,अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस म्हणून ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.याच दिवसाचे औचित्य साधून ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे ९ मार्च २०२६ रोज सोमवारला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माननीय प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. जागृती कुमरे मॅडम प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर या होत्या.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्रा.डॉ.प्रणाली टेंभुर्णे मॅडम उपस्थित होत्या.
दीप प्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जागृती कुमरे मॅडम यांनी स्त्रियांचे अधिकार काय आहेत ते सांगण्यासाठी विविध शासकिया तरतुदी स्पष्ट केल्या.प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉ. प्रणाली टेंभुर्णे मॅडम यांनी महिला स्वावलंबी व भावनिक स्वरूपाच्या असतात आणि आपल्या कामावर किती प्रभुत्व असतो यावर सखोल चर्चा केली.
अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ.सुनंदा आस्वले यांनी लिंगभेद समानतेवर मार्गदर्शन केले व तसेच स्त्रिया विविध कामगिरीत अग्रेसर आहेत ही उदहरणातून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सरताज शेख समन्वयक अंतर्गत तक्रार समिती यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्रा.श्रद्धा डोईजड मॅडम यांनी केले.
आभार प्रदर्शन डॉ.प्रणाली टेंभुर्णी मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरीता महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा महत्वाचा वाटा होता.



