Home Social जि.प.शाळा वडूरा येथे महिला दिन संपन्न… 

जि.प.शाळा वडूरा येथे महिला दिन संपन्न… 

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळा वडूरा येथे जागतिक महिला दिन संपन्न झाला. शाळेतील विद्यार्थीनींनी महिलांचा वेशभूषा परिधान करुन त्यांच्या भुमिका सादर केल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी सेविका सौ. मिनाताई उंबरकर प्रमुख अतिथी सौ. ज्योतिताई उंबरकर सौ. प्रतिक्षाताई हरणे, सौ.सुलभाताई नांदणे तर मुख्य मार्गदर्शक म्हणून कू. मनिषाताई लोणकर उपस्थित होत्या. 

       सर्व प्रथम माता सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. देशाच्या कर्तृत्ववान महिलांचा वेशभूषा आणि त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा सन्मानार्थ शाळेच्या विद्यार्थीनींनी वेशभूषा व त्यांच्या भुमिका सादर केल्या.

       यात कु उन्नती तायडे,कु श्रेया भोरखडे, कु श्रुती भोरखडे, कु नंदिनी भोरखडे, कु परी पंडित, कु वेदु अमझरे, कु ईश्वरी चव्हाण, कु ईश्वरी भानगे, कु प्रिया उंबरकर, कु आराध्या पवार या विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला होता.अध्यक्षांनी आणि प्रमुख अतिथींनी सुद्धा महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.

       शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थीनींना उत्कृष्ट व दर्जेदार सादरीकरणासाठी योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य केले उपस्थितांचे शाळेच्या वतीने कु मनिषा लोणकर यांनी आभार मानले.