Home Political चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बांधणीकडे आता नागरिकांचे...

चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बांधणीकडे आता नागरिकांचे लक्ष….

   वृत्तवेध

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

      राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर झाल्याने,या पक्षात फेरबदलातंर्गत डावपेच पुढे बघायला मिळणार आहेत.तद्वतच नवीन पदाधिकाऱ्यांना नव्या उमेदीने पक्षात काम करण्याची संधी मिळणार आहे…

        चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मतदार जे आहेत,ते त्याच ठिकाणी राहणार की पक्ष पदाधिकाऱ्यांप्रमाणे कोलांट्या मारणार,हे सुद्धा काही दिवसातच कळणार आहे….

        राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र विधीमंडळ पक्ष नेते तथा माजी मंत्री,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे पराभवाची भाषा करीत नसल्याने ते केव्हा कोणत्या गोट्या खेळायला काढतील हे गुलदस्त्यातच राहते…

          मात्र,विजयभाऊ वडेट्टीवार हे हिम्मत व आत्मविश्वास न हारणारे नेतृत्व असल्याने आणि त्यांची कार्यपद्धत सर्वसमावेशक असल्याने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आशावादी असतोय,हे सुध्दा चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना माहीती आहे.

            यामुळे चिमूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय व सामाजिक गणिते बदल घडवून आणण्यासाठी अनुकूल असतात याबाबतचा अनुभव स्थानीक मतदारांना आहे….

          वेळेनुसार पक्षांतर केल्याने,स्थानिक ठिकाणी बदल होणे हे सहाजिकच आहे.परंतू वर्तमान काळात आणि भविष्य काळात मतदारांनी कुणावर विश्वास दाखवला पाहिजे,हा प्रश्न त्यांच्यापुढे आवासुन उभा असणार आहे.

       राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे स्थानिक तथा अनुभवी पदाधिकारी स्थिर असल्याने त्यांचा अनुभव व त्यांची कार्यक्षमता चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत पक्षाला बळकटी देण्यासाठी सार्थकी ठरणार आहे,असे मानावेच लागेल…

         मात्र,विजयभाऊ वडेट्टीवारांच्या कार्यपद्धतीचा विश्र्वास हा कुणाकडे वळतोय आणि चिमूर विधानसभा मतदारसंघाची धूरा ते कुणाकडे देतात,यावर पक्षाची दारमदार असेल.

            चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत जुन्या पदाधिकाऱ्यांसह नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने वेगवेगळ्या पध्दतीचे राजकीय व सामाजिक समिकरण बघायला मिळणार आहेत.

           चिमूर तालुक्यातील जुनेद खान,प्रा.राम राऊत,माधव बिरजे,धनराज मुंगले,डॉ.विजय गावंडे,राजू लोणारे,संजय घुटके,यांच्यासह अनेक मातब्बर हे पक्षात जैसे थे असल्याने,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नवीन उभारी देण्यासाठी ते विजयभाऊ वडेट्टीवारांचे उत्तम,विश्वासू म्हणून दिसणार आहेत.

          याचबरोबर नागभिड तालुक्यातील पक्ष पदाधिकारी हे विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या जवळचे असल्याने ते सुद्धा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी श्रम घेणारच असे म्हणावे लागेल…

        पुढील काळात चिमूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.यामुळे विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष वेळोवेळी लागून असणार आहे.