राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
नागरीकांचे शासकीय सामुहिक, वैयक्तिक लाभाचे कामे सूलभ व जलदगतीने व्हावे म्हणून महसूल विभागाचा वतीने शासन आपल्या दारी योजने अंतर्गत मंडळ स्तरावर शिबीरे आयोजित करीत जबाबदार प्रशासन म्हणून आपली प्रतिमा तयार करीत आहे.
मात्र काही बेजबाबदार व कामचूकार कर्मचार्याकडून शाशकीय स्तरावरून सूरू या प्रयत्नाला खो देण्यात येत असल्याचा प्रत्येय कूरखेडा तहसील कार्यालय अंतर्गत जमीन शाखेत नूकताच अनूभवास आला.
शहरातील एका आदिवासी समाजाचा महिलेला मूलाचा नावाने पूरग्रस्त असल्याने उपलब्ध करून देण्यात आलेला प्लाट साठी शासकीय फी जमा करीत ताबा मिळविण्याकरीता मागील एक वर्षापासून कार्यालयाची पायपीट करावी लागत आहे.
शहराचा सतीनदी काठावरील काही पूरग्रस्त कूटूंबाचे काही वर्षापूर्वी सूरक्षित ठिकाणी पूनर्वसन व्हावे म्हणून त्याना सूरक्षित असलेल्या शासकीय आबादी जागेत नाममात्र दरात प्लाट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यावेळी शासकीय फी जमा करीत प्लाटचा ताबा घेणे आहे,तर अनेक लाभार्थीनी प्लाटची फी भरत ताबा घेतलेला आहे तर काही लाभार्थी वेळेवर फी भरू न शकल्याने किंवा अन्य कारणाने अद्याप ताबा घेऊ शकलेले नाही. माया निलकंठ आलाम या आदिवासी महिलेला सूद्धा त्याचा मृतक मूलाचा नावाने प्लाट उपलब्ध करून देण्यात आला आहे ,तिला प्लाटचा ताबा हवा आहे.
याकरीता ती येथील जमीन शाखेत मागील एक वर्षापासून घिरट्या घालत आहे.अधिकारी बदलले मात्र काम काही होईना.आता मागील काही महिन्या पासुन येथे पदस्थ साहायक महसूल अधिकारी जूमनाके यांचे कडे गेली असता प्रकरण शोधतो,मिळत नाही आहे,मला तेच कम आहे का, असे बोलत तिला वारंवार पायपीट करण्यास भाग पाडत आहे.
आज दि ९ मार्च रोजी लाभार्थी माया आलाम यांचा प्रकरणा संदर्भात स्थानिक शिवसेना तालूका प्रमूख तथा नगरसेवक,सामजिक कार्यकर्ते आशिष काळे यांनी जमीन शाखेत चौकशी केली. यावेळी महसूल साहायक जूमनाके यानी मला तेच काम आहे का? तहसीलदार याना माहीती विचारा,तेच तुम्हाला देतील,तेव्हा काळे यानी त्याना म्हटले की नसेल तर तसे लिहून द्या,या वर उध्दट पणे तहसीलदार लिहुन देतील,मी नाही लिहुन देत असे उध्दट उत्तर दिले त्यामूळे अशा उद्धट व कामचूकार व शाशन आपल्या दारी योजनेचा हेतूलाच हडताळ फासणार्या अधिकाऱ्याची चौकशी करीत कार्यवाही करावी व आदिवासी महिलेला न्याय देण्यात यावा असे निवेदन आज तहसीलदार कूरखेडा याना लाभार्थी माया आलाम यानी दिले आहे.
सदर प्रकरणाची चौकशी करीत मूजोर कामचूकार कर्मचार्यावर कार्यवाही न झाल्यास शिवसेनेचा वतीने आंदोलन पूकारण्यात येईल असा इशारा सूद्धा याप्रसंगी नगरसेवक आशिष काळे यानी दिला आहे.



