दोन देशात युद्ध होते, जगातील काही देश, कुणी याची तर कुणी त्याची बाजू घेतात,अर्थात त्यातील त्यांच्या सोयीनुसार स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी किंवा स्वतःचे नुकसान होऊ नये म्हणून.
मोठमोठे दोन गट पडतात आणि त्यातून विश्व युद्ध होते,यालाच जागतिक युद्ध पण म्हणतात,अशी जागतिक युद्धे दोन झाली,आता तिसरे होण्याची शक्यता आहे.
जेंव्हा जागतिक युद्ध पेटते,तेंव्हा अशा युद्धात त्या त्या देशातील बिचारी सामान्य आणि निष्पाप जनता लहान मुले यांचा हकनाक बळी जातो. हजारो लाखो लोक मरतात,भयानक जीवित हानी होते, श्रमा तून निर्माण झालेली अफाट संपत्तीचा नाश होतो,म्हणजेच जीवित आणि.वित्त हानी होते, हजारो सैनिक मारले जातात,त्यांच्या बायका विधवा होतात,त्यांची मुले पोरके होतात,त्यांचे संसार उध्वस्त होतात, एव्हढा विध्वंस झाल्या नंतर कुणीतरी हरतात,आणि कुणीतरी जिंकतात,आणि युद्ध थांबते.
अशा युद्धाने लखीजीव जातात आणि करोडो रुपयांची मालमत्ता जळून खाक होते,परंतु याहीपेक्षा भयंकर दुष्परिणाम म्हणजे जगाचे पृथ्वीचे पर्यावरण बिघडते,समतोल बिघडतो, माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे हवा आणि पाणी दूषित होते,त्यास शुद्ध करणे जिकीरीचे असते.माणसांच्या श्वसनक्रियावर होणाऱ्या परिणामास पुढील पिढ्यांना तोंड द्यावे लागते.डोळे कान,फुप्फुसे, लिव्हर,यकृत,किडनी, पोट यावर दुष्परिणाम होतात,लहान मुले ,बाळांचे अवयव वाकडे तिकडे होतात.एकंदरीत आरोग्यावर,पर्यावरणावर,आर्थिक परिस्थितीवर दुष्परिणाम होतात,बसवलेली घडी विस्कटून जाते.यामुळे वर्तमान आणि भावी पिढीला जीवन जगणे कठीण जाते.
हे सारे माहित असताना पण देशांच्या प्रमुखांना युद्ध का करावे वाटते ? याचे कारण म्हणजे सत्ता संपती प्रतिष्ठा याचा लोभ.या सोडाव्या वाटत नाहीत,यासाठी स्वतःचा आणि देशातील जनतेचा जीव गेला तरी चालेल,कितीही मालमत्तेची नुकसान झाली तरी चालेल,पर्यावरणाचा — हास झाला तरी चालेल,पण हार मानायची नाही.” मोडेल पण वाकणार नाही, तुटेल पण हरणार नाही,ही जिद्द आणि अहंकार आणि स्वार्थ आणि मोह,यामुळे देशाचा प्रमुख स्वतःचा विचार करतो,पण देशातील जनतेचा विचार करून राज्य सोडत नाही. स्व अभिमान अहंकार साठी तो लाखो सैनिक आणि जनतेचा जीव घेतो. स्वतः पण जीव देतो.
आता आपण युद्धाचे कारण शोधू या.युद्धाचे कारण म्हणजे संपत्तीचे केंद्रीकरण,यामुळे साठवलेली संपती सुरक्षित राहण्यासाठी सत्ता हाती पाहिजे.सत्ता हाती असली की,पोलिस,मिलिटरी,सरकारी कार्यालये आपल्या ताब्यात राहतात,त्यांचा वापर आपली केंद्रित झालेली अफाट संपत्तीचे जतन करता येते,संरक्षण करता येते,म्हणून भांडवलदार आपले ऐकून राहणारा प्रधानमंत्री निवडतात,किंवा खाजगीकरणाचे धोरण असणाऱ्या पक्षाला सत्तेत येण्यासाठी निवडणुकीत करोडो रुपये देतात.प्रचारासाठी आणि मतदारास देण्यासाठी.हे भांडवली लोकशाहीत घडते.जिथे लोकशाही नाही,राजेशाही आहे,उदा.अरब राष्ट्रे,तेथील राजे राजवाडे यांचे कडे अफाट संपत्तीचे केंद्रीकरण झालेले असते,म्हणजे सारी संपती एकाकडेच एकवटली असते,थोडीशी जनतेकडे असते.अशा देशात संपूर्ण खाजगीकरणाचे राजकीय धोरण असते,अर्थात एव्हडी संपती असूनही अजून इतर देशांच्या संपत्तीवर डोळा असतोच, ज्या देशात भरपूर खनिज संपती आहे,ज्या देशात अन्नधान्य,फळे, नगदी पिकांचे उत्पादन अधिक होते, ऊस कापूस,रेशीम चहाचे मळे, अंगुर,खजूर,फळे,तसेच लोखंड,तांबे, अभ्रक, जस्त, सोने अशी खनिजे ,तसेच पेट्रोल डिझेल,रॉकेल,कोळसा ज्या देशात अधिक आहे,अशा देशाशी युद्ध करून तो देश जिंकून ताब्यात घ्यायचा,नाहीतर त्या देशांना आपले मंडलिक म्हणून राहण्यास भाग पाडायचे,असे धोरण शक्तिशाली देशांचे असते,थोडक्यात काय तर संपत्तीचा अतिलोभ,त्यातून ती मिळवण्यासाठीची महत्त्वाकांक्षा,त्यातून कपट कारस्थाने,दुष्टनिती,वाकड्या मार्गांचा अवलंब,भांडण उकरून काढणे,करार करणे,ते मोडणे अशी अनेक कटकारस्थाने करून शेवटी युद्ध पुकारणे हा धंदा भांडवली देशांचा असतो.हे सारे का घडते ? याचे कारण सत्ता संपत्तीचे केंद्रीकरण होय.खाजगीकरण होय.खाजगीकरणाचे धोरण सोडायचे तर विकेंद्रीकरण हे धोरण सरकारने स्वीकारायचे असतात,परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगीकरण सत्तेचे संपत्तीचे केंद्रीकरण यासच महत्व दिले जाते,कारण याशिवाय भांडवलशाही जिवंतच राहू शकत नाही.भांडवलशाही देशांना समाजवादी साम्यवादी धोरण मान्य नसते,कारण त्यात विकेंद्रीकरणाचे धोरण विचार सूत्र असते.चारदोन देशात समाजवाद आला तरी तो टिकत नाही,त्याचे कारण त्यांची ताकद कमी पडते.यासाठी जगातील 60 टक्के देशात विकेंद्रीकरणाचे धोरण असलेल्या समाजवादी पक्षांचे किंवा सत्तांचे राज्य हवे आहे,यामुळे यांची शक्तित वाढ होऊन भांडवशाही राष्ट्रांना ते हरु शकतील.
खरे तर युद्ध नको बुद्ध हवा.हिंसा नको,अहिंसा हवी.पूर्ण जगात हवी.पण हा केवळ आदर्शवाद ठरतो,कारण स्वार्थ लोभ महत्वाकांक्षा,अहंकार हे माणसाकडे असतात,या गोष्टीना जी माणसे महत्त्व देतात,अशी माणसे संपत्तीचा साठा करण्याचा प्रयत्न करतात,आणि अशीच माणसे दुष्ट कपटी असतात,स्वतःच्या स्वार्थापुढे यांना जग दिसत नाहीत.सत्ता संपती प्रतिष्ठाने ते आंधळी होतात,अन्याय अत्याचार भ्रष्टाचार हिंसा करतात,अशा प्रवृत्तीच्या माणसांना धर्मोपदेश करून व्यर्थ असते,यांच्यापुढे बुद्धाला येशूला महावीर यांना हार मानावीच लागते, नाइलाज होतो,अशावेळी कृष्ण नीती,चाणक्य निती कामी येते.परंतु यांची नीतीचा वापर भांडवलशाही साठी न करता निस्वार्थी अशा समतेच्या राज्यासाठी केला पाहिजे.
समतेच्या राज्यातच येशू बुद्ध महावीर यांचे तत्वद्न्यान रुजू शकते,विषमतेच्या राज्यात शक्य नाही,
संपत्तीचे केंद्रीकरण,त्यातून भांडवलशाही,त्यातून आर्थिक शोषण,त्यातून सत्तेचे केंद्रीकरण,त्यातून हुकुमशाही,त्यातून अन्याय अत्याचार,भ्रष्टाचार अशी ही चैन निर्माण होते.ही चैन तोडावी लागेल.ही चैन तोडण्याचा एकच मार्ग,उपाय तो म्हणजे खाजगीकरणास विरोध,केंद्रीकरणास विरोध,हुकूमशाहीला विरोध या संघटित विरोधातून संघर्षातून सत्ता बदल,सत्ता बदलून मग व्यवस्था बदल,यासाठी खाजगी मालमत्तेचे राष्ट्रीयकरण करणे.यातून मालकीहक्क संपुष्टात आणणे,आणि शोषण विरहित आर्थिक व्यवस्था प्रस्थापित करणे.हाच खरा,योग्य,कायमस्वरूपी मार्ग युद्ध निर्मुलनाचा होऊ शकतो.या धोरणामुळे,अशा व्यवस्थेमुळे जगात युद्धेच होणार नाहीत.कारण स्वार्थी लोभी अहंकारी लोकांना संपती मिळवण्याचा हक्क कायद्यानेच मिळणार नाही.असे असेल तर हे भांडवलदार बनतील कसे ?
जग सुंदर शांत सुखी संपन्न बनवायचे असल्यास वसुधैव कुटुंबकं,विश्वाची हे माझे घर,असा विचार दृढ करावा लागेल,तरच शोषण आणि शासन ( हुकुमशाही ) विरहित समाजरचना निर्माण होईल.


