भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा : विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाची जाणीव निर्माण करून स्वावलंबनाकडे वाटचाल घडवून आणण्याच्या उद्देशाने तालुका स्तरीय व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी मस्के सर, मुख्याध्यापक चौधरी सर तसेच मुख्याध्यापक मंडलवार सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळात कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून देत रोजगाराच्या संधींसाठी उद्योजकता हा प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले.
या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना लघुउद्योग सुरू करण्याच्या पद्धती, व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक नियोजन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक नोकरीच्या चौकटीबाहेर विचार करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे धाडस दाखवण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातून उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबद्दलची नक्कीच उत्सुकता निर्माण होईल असे मत आयोजकांनी व्यक्त केले.
या प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून प्रा कैलास खोब्रागडे व फुंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.



