Home Social जागतिक महिला दिनानिमित्त साळवे स्वस्त औषधी सेवा राजुरा यांचा अनोखा उपक्रम…

जागतिक महिला दिनानिमित्त साळवे स्वस्त औषधी सेवा राजुरा यांचा अनोखा उपक्रम…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

चंद्रपूर :-

         क्षयरोग एक संसर्गजन्य आजाराबरोबर एक सामाजिक समस्या आहे.क्षयरोग भारतातील सर्वात मोठे सार्वजनिक आरोग्य आव्हाना पैकी एक असून दरवर्षी 26 लाख नवीन क्षय रुग्ण निर्माण होऊन त्यापैकी ४.४ लाख रुग्ण दगावतात.

       शासन स्तरावर रुग्णाला औषधोपचार मोफत मिळतय.तसेच एक हजार रुपये दर महा मिळतोय.परंतु यांना सकस आहार पोषण युक्त मिळावा यासाठी शासनाने आव्हान केले. 

                                     सामाजिक संस्था,सामाजिक कार्याची आवड असणारे व्यक्ती यांनी मदत करावी व टीबी रुग्ण यांना पोषण आहार किट द्यावी त्यांना सात प्रतिसाद म्हणून साळवे स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअर्स संचालक श्रीमती माधुरी साळवे यांच्या कडून दोन टीबी रुग्ण यांना पोषण कीट व श्री.प्रमोद लहुजी साळवे यांचेकडून दोन पोषण किट,तसेच वाढदिवसानिमित्य हर्ष बजरंग जेणेकर राजुरा यांचे कडून सुद्धा दोन पोषण किट असे एकूण सहा जिवती तालुक्यातील टीबी रुग्णांसाठी पोषण आहार किट श्री.सचिन शरद बरडे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर जिवती यांच्या माध्यमातून टीबी रुग्णांपर्यंत पोहचवण्यात आले.

          पोषण आहार किट देऊन सहकार्यासाठी डॉ. टेंभे तालुका आरोग्य अधिकारी जिवती यांनी साळवे व जेणेकर परिवाराचे आभार मानले.