Home Political राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा विधानसभा आरमोरी क्षेत्रात ११ व १२ मार्चला बैठकीचे...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा विधानसभा आरमोरी क्षेत्रात ११ व १२ मार्चला बैठकीचे आयोजन…. — आमदार डॉ राजे धर्मरावबाबा आत्राम माजी मंत्री तथा वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष रा.काँ.पा.यांच्या सूचनेनुसार बैठकीचे आयोजन…

राजेंद्र रामटेके 

 विशेष प्रतिनिधी 

       आरमोरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती,ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने आरमोरी विधानसभा क्षेत्रात दौरा व संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

आयोजन खालील प्रमाणे…

    १) दिनांक :- ११/०३/२०२६ बुधवारला,दुपारी :- ०१:०० वा. आरमोरी येथे बैठक होणार आहे तर दुपारी :- ०३:०० वा. देसाईगंज येथे बैठक होणार आहे.

      २) दिनांक :- १२/०३/२०२६ गुरुवारला,सकाळी :- ११:३० वा.कोरची येथे बैठक होणार असून दुपारी :- ०३:३० वा. कुरखेडा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

          या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.रविंद्र वासेकर जिल्हा अध्यक्ष रा.काँ.पा.,डॉ.रामकृष्णजी मडावी माजी आमदार,नानाभाऊ नाकाडे प्रदेश उपाध्यक्ष,रा.काँ.पा.,मोहम्मद युनूस शेख प्रदेश सरचिटणीस रा.काँ.पा.तथा गटनेता,न.प.देसाईगंज,नंदुभाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष, रा.काँ.पा.,तनुश्रताई आत्राम जिल्हाध्यक्षा,रा.युवती काँग्रेस तथा सिनेट सदस्या,गोंडवाना विद्यापीठ,डॉ.सोनल कोवे जिल्हाध्यक्षा,रा.महिला काँग्रेस,लीलाधर भरडकर जिल्हाध्यक्ष रा.यु.काँ.तथा सभापती न.प.गडचिरोली,जेसाभाऊ मोटवानी माजी नगराध्यक्ष देसाईगंज,पिंकु बावणे सभापती न.प.देसाईगंज,तसेच सर्व फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

       ११ व १२ मार्चला होणाऱ्या या बैठकीला उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी अशी विनंती श्री.किशोर तलमले विधानसभा क्षेत्र अध्यक्ष,रा.काँ.पा.श्री.सुनिल नंदनवार विधानसभा क्षेत्र सह-अध्यक्ष रा.काँ.पा.यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना केली आहे.