Home Social रजत वाळके यूपीएससी उत्तीर्ण,घेतली झेप!.. — आपचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे...

रजत वाळके यूपीएससी उत्तीर्ण,घेतली झेप!.. — आपचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे यांनी केलाय त्यांचा गौरव…

राजेंद्र रामटेके 

 विशेष प्रतिनिधी 

     गडचिरोली जिल्हातंर्गत अतिदुर्गम भागात राहणारे रजत वाळके यांनी युपिएससी परिक्षेत यश संपादन केले.नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय.ते देशातील कठीण परीक्षेमध्ये 514 वि रँक घेत उत्तीर्ण झाले.

         I R S अधिकारी भरत आंधळे यांचे “गरुडझेप एक ध्येयवेडा प्रवास ” हे पुस्तक देवून व पुष्पगुच्छान्वये रजत वाळके यांच्या निवासस्थानी गौरविण्यात आले.

       त्यांनी नागपूर येथे कम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी पदवी प्राप्त करून आणि युपिएससी परिक्षेत पास होत आई वडिलांचे नाव लौकिक केले.जिल्ह्याचा सन्मान राखलाय.

              इतर स्पर्धकांनी जिद्द,परिश्रम,व सातत्य ठेवून संघर्ष करावे तरच यश प्राप्त होतोय अशा सद्भावना व्यक्त करत पुढील देशभक्ती करण्याच्या वाटचालीसाठी रजत वाळके यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात…

      गडचिरोली जिल्ह्यातून रजत वाळके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

       रजत वाळके यांचे अभिनंदन,स्वागत करताना आणि त्यांना शुभेच्छा देतांना आम आदमी पार्टीचे पदाधिकारी भास्कर इंगळे,प्रेम धोबे,विजय भेंडारे,सदाशिव पेंदाम,संजय वाळके,आदी उपस्थित होते.