Home Social आमदार रामदास मसराम यांच्या पाठपुराव्याने सुरु झालेल्या बहू प्रतिक्षित नागपूर बसच्या चालक...

आमदार रामदास मसराम यांच्या पाठपुराव्याने सुरु झालेल्या बहू प्रतिक्षित नागपूर बसच्या चालक – वाहकाचा सत्कार… — शहर विचार मंचाचा पूढाकार…

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी

       कूरखेडा ते नागपूर ही कोरोना काळापासून बंद करण्यात आलेली थेट एस टी महामंडळाची बस सेवा वारंवार विविध माध्यमाने करण्यात येत असलेल्या व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे जनसामान्यांच्या मागणी कडे आवर्जून लक्ष देणारे आमदार रामदास मसराम यांचे पाठपूराव्यानंतर अखेर पूनश्च सूरू करण्यात आल्याने शहर विचार मंच कूरखेडा व नागरीकांचा वतीने आज बस स्थानक कूरखेडा येथे पोहचत बसची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली.

         यावेळी बस चालक व वाहकाचा दूपट्टा श्रीफळ व पूष्पगूच्छ तसेच पेढा भरवत सत्कार सूद्धा करण्यात आला.

             मागील जवळपास ६ वर्षापासून कोरची-नागपुर, कूरखेडा ते थेट नागपूर ही महामंडळाची बस सेवा बंद करण्यात आली होती. कोरोना काल लोटूनही ही बस सेवा पूर्ववत सूरू करण्यात न आल्याने येथील प्रवाश्याना विषेशता वयोवृद्ध व महिला प्रवाश्याना नागपूर करीता तूटक तूटक शारिरीक,आर्थीक त्रासदायक प्रवास करावा लागत होता यासंदर्भात अनेकदा शहर विचार मंचाचा वतीने स्थानिक बस स्थानक प्रमूख श्रीधर शिवणकर यांचा मार्फत पाठपूरावा करण्यात येत होता तसेच नूकतेच आमदार रामदास मसराम यांनी सूद्धा जिल्हाधिकाऱ्यांचा उपस्थीत महामंडळाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आनलाइन बैठकीत कोरची, कूरखेडा ते नागपूर ही थेट बस सेवा व कूरखेडा येथे बस आगाराचे बांधकामाची मागणी प्रभावी पणे मांडली होती अखेर त्यांचा प्रयत्नाला यश येत कोरची -नागपूर व कूरखेडा -नागपूर या दोन बस फेऱ्या सूरू करण्यात आल्याने शहर विचार मंचाने महामंडळ व आमदाराचे आभार व्यक्त करीत आज नागपूर बस फेरीचे चालक लक्ष्मन श्रीराव व वाहक रहाटे यांचा सत्कार केला.

          याप्रसंगी शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी कांग्रेस तालूका अध्यक्ष जिवन नाट माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, राष्ट्रवादी कांग्रेस तालूका अध्यक्ष राम लांजेवार, नगरसेवक एड. उमेश वालदे डॉ सतिश गोगूलवार, प्रा कीशोर खोपे,प्रा डॉ दशरथ आदे, डॉ जगदीश बोरकर,केशव गूरनूले, राजेश उईके,सि एल डोंगरवार,पूंडलिक देशमुख,पूष्पराज रहांगडाले,ममता गिरडकर,योगीता मडावी, राजेश जेठानी,जावेद शेख,सामाजिक कार्यकर्ते राकेश चव्हाण,पत्रकार सिराज पठान,चेतन गहाने, नायब तहसीलदार रेखा बोके,श्यामराव सोनूले व शहराचे नागरीक व प्रवासी हजर होते.उपस्थीत प्रवास्यांनी बस सुरु झाल्या मुळे आमदार रामदास मसराम यांचे आभार मानत बस सेवा नियमित स्वरूपात चालू राहीलि पाहिजे या करीता महामंडळ अधिकारी वर्गला सुचना द्यावी ही विनंती केली.