Home Social नगरपरिषद चिमूर कडून शुभम पसारकर यांचा पर्यावरण दूत म्हणून गौरव… —...

नगरपरिषद चिमूर कडून शुभम पसारकर यांचा पर्यावरण दूत म्हणून गौरव… — पर्यावरण दूत म्हणून नेमणूक…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

        शुभम पसारकर यांचा पर्यावरण दूत म्हणून नगरपरिषद चिमूर कडून गौरव करण्यात आला.हा गौरव त्यांच्या विशेष कामगिरी बाबत करण्यात आला आहे.

         चिमूर नगरपरिषदेच्या वतीने माझी वसूंधरा ६-० अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी घेण्यात येत असलेल्या उपक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पर्यावरण दूत म्हणून नेमणूक करुन,शुभम पसारकर यांना गौरविण्यात आले आहे.

       नगराध्यक्ष गिताताई लिंगायत,उपाध्यक्ष संजय नवघडे,मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या स्वाक्षरी असलेले,”पर्यावरण दूत नियुक्ती गौरव प्रमाणपत्र,नगरपरिषद चिमूर येथे शुभम पसारकर यांना देण्यात आले.