जेंव्हा हिटलर संपूर्ण जग जिंकण्याच्या हव्यासापोटी आणि तसा तो सुरुवातीला यशस्वी सुद्धा होत गेला. परंतू झटपट जग जिंकण्याच्या मानसिकतेत त्याने आपल्या शास्त्रज्ञाना आदेश दिले की मला सर्वात जास्त महाविनाशकारी बॉम्ब पाहिजे. त्यासाठी वाट्टेल ते करा. तेंव्हा जर्मनीच्या प्रयोगशाळेतील प्रमुख शास्त्रज्ञाच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली की महाविनाशकारी अणुबॉम्ब बनविण्यासाठी अलबर्ट आईन्स्टाईनची आवश्यकता आहे. आईन्स्टाईन तर जर्मनीतून भूमिगत झालेले आहेत ( कारण आईन्स्टाईन यहूदी असल्याने आणि हिटलर यहूदीचा कर्दनकाळ ठरला होता ). ही वार्ता अमेरिकेत आश्रय घेतलेल्या आईन्स्टाईनच्या कानावर गेली. आईन्स्टाईन यांनी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना पत्राद्वारे कळविले की हिटलरच्या विकृत मेंदूत महाविनाशकारी अणुबॉम्बची कल्पना आलेली आहे. त्याने ती जर साध्य केली तर, संपूर्ण जगाला तो वेठीस धरेल. तेंव्हा त्याच्या अगोदर आपण जर हा अणुबॉम्ब बनवला तर त्याला आपण रोखू शकतो. ही कल्पना रुझवेल्ट यांना आवडली. त्यांनी लागलीच या कल्पनेला होकार दिला. तेंव्हा अल्बर्ट आईन्स्टाईन, डॉ. ओपन हायमर आणि डॉ. लिनस पाऊलिंग यांच्या नेतृत्वात अणुबॉम्ब बनविण्यासाठी 1943 मध्ये मेक्सीकोच्या सीमेजवळील वाळवंटात मॅन हॅटन प्रोजेक्ट राबवण्यास केली. पाऊणेदोन वर्षे अथक प्रयत्न केल्यानंतर युरेनियम आणि प्लुटोनियम असे दोन अणुबॉम्ब बनविण्यात यश आले. तोपर्यंत इकडे हिटलरच्या वारूची घोडदौड चालूच होती. जपान सुद्धा हिटलरला जाऊन मिळालेला होता. अचानक जपानने अमेरिकेच्या पर्लहार्बर बंदरात उभ्या असलेल्या युद्धनौकेवर बॉम्ब टाकून उध्वस्त केले ( जसे काल अमेरिकेने इराणचे जहाज भारताच्या सीमेत येऊन श्रीलंकेजवळ उडविले ). म्हणून अमेरिकेने जपानच्या हिरोशीमा आणि नागासाकी या दोन शहरावर अनुक्रमे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट रोजी अणुबॉम्ब टाकले. या दोन्ही अणुबॉबची तीव्रता एवढी होती की, अक्षरंशा तेथील रेल्वेरूळ वाकडेतिकडे होऊन गेले होते. *कोहची अकिरा* नावाच्या एका व्यक्तीने अनुभव सांगितला की स्फ़ोटानंतर दोन दिवसांनी जेंव्हा तो त्या शहरात गेला होता. तेंव्हा त्याने रस्त्याच्या कडेला एक बाई विव्हळत होती. तीच्या अंगावरचे मास सर्व गळून पडलेले होते. म्हणून त्याने तीला हाताला धरून उठवण्याचा प्रयत्न असताना तो हातच त्याच्या हातात उपसून आला होता……..!
अशी अवस्था संपूर्ण दोन्ही शहरांत झाली होती…..!
या महाविनाशाच्या अगोदरच हिटलरने युद्धाचा रोख पाहुन आणि जर्मनीचा पाडाव पाहुन आत्महत्या केली होती.
हा महाविनाश जेंव्हा वरील तिन्ही प्रमुख शास्त्रज्ञानी स्वतः डोळ्यांनी अनुभवला……….
तेंव्हा त्यांच्यातील बुद्ध जागा झाला…………
त्यांनी लागलीच युनोच्या महासचिवाला पत्र लिहिलं की, यापुढे जर तुम्ही अणुबॉम्ब बनवले आणि त्यांची अंमलबजावणी केलीच तर चौथे जागतिक महायुद्ध कधीही होणार नाही. कारण तिसऱ्या जागतिक अणूयुद्धामध्येच सर्वकाही संपेल.
असा इशारा देऊन सुद्धा 1945 मध्ये प्रथम अमेरिकेने अनुचाचणी करून अणुबॉम्ब बनवले. त्यानंतर चार वर्षांनी 1949 मध्ये रशियाने अनुचाचणी करून अणुबॉम्ब बनवले. त्यांच्यानंतर ब्रिटनने ( इंग्लंडने ) 1952 मध्ये अनुचाचणी करून अणुबॉम्ब बनवले. त्यांच्यानंतर फ्रांसने 1960 मध्ये अनुचाचणी करून अणुबॉम्ब बनवले. त्यांच्यानंतर 1964 मध्ये चीनने अनुचाचणी करून अणुबॉम्ब बनवले. त्यांच्यानंतर इस्राएलने 1967 मध्ये अनुचाचणी करून अणुबॉम्ब बनवले परंतू त्यांनी ही बातमी गुप्त ठेवली, शेवटी 1986 मध्ये इस्राएलने उघड केली. 1974 मध्ये भारताने इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना पहिल्यांदा भारताने सुद्धा राजस्थानमधील पोखरण येथील वाळवंटात अनुचाचणी करून अणुबॉम्ब बनवले. भारतानंतर द. आफ्रिकेने 1977 मध्ये अणूचाचणी करून अणुबॉम्ब बनवले खरे…….
परंतू त्यांच्यातील सुद्धा *बुद्ध* जागा झाला. आणि त्यांनी बनवलेला अणुबॉम्ब नष्ट केला आणि ठरवलं की माणसाला आणि सजीव सृष्टीला संपवणारा अणुबॉम्ब आम्ही यापुढे कधीही बनवणार नाहीत…..
त्यानंतर पाकिस्तानने 1998 मध्ये अनुचाचणी करून अणुबॉम्ब बनवले. त्यांच्यानंतर शेवटी उत्तर कोरियाने 2006 मध्ये अनुचाचणी करून अणुबॉम्ब बनवले.
अशाप्रकारे एकूण 10 देशांनी अनुचाचण्या केल्या आणि अणुबॉम्ब बनवले. परंतु द. आफ्रिकेने मात्र अनुचाचणी करून अणुबॉम्ब बनवून तो नष्ट केल्याने एकूण 205 देशांपैकी केवळ नऊ देशाकडेच अणुबॉम्ब आहेत.
यामध्ये रशिया – 5500, अमेरिका – 5044, चीन – 500, फ्रांस – 290, इंग्लंड – 225, भारत – 172, पाकिस्तान – 170, इस्राएल – 90, उत्तर कोरिया – 50
असे नऊ देशांकडे मिळून 12041 अणुबॉम्ब आहेत. यातील एक एक अणुबॉम्ब जपानच्या हिरोशीमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा पाचशेपटीने घातक आहे……..!
ही वरील माहिती युनोच्या वर्ल्ड बुलेटिन ऍटोमिक साइंटिस्ट च्या अहवालानुसार जाहीर झालेली आहे.
परंतू , याव्यतिरिक्त एक गुप्त अहवाल असाही आहे. ज्याला पुराव्यानुसार सिद्ध करता येत नाही. तो हा की 1978 च्या दरम्यान केवळ पाच देशांकडे जवळपास एकूण 65000 अणुबॉम्ब होते. परंतू 1977 च्या द. आफ्रिकेच्या निर्णयामुळे यांच्यातील सुद्धा बुद्ध जागृत झाल्यामुळे त्यांनी आपले अणुबॉम्ब नष्ट करून 65000 वरून 20000 वर आणली होती. आणि आज जी 2026 मध्ये जी जगातील एकूण नऊ देशांकडे रेकॉर्डेड 12041 अणुबॉम्ब आहेत. त्यापेक्षा प्रत्यक्षात त्यांची संख्या दुप्पट म्हणजे 24000 च्या आसपास आहे. परंतू हे पुराव्यानुसार सिद्ध करता येत नाहीत म्हणून जाहीर झालेले नाही.
म्हणजे एकंदरीत हे जगच काय तर संपूर्ण पृथ्वी या रेकॉर्डेड 12041 अणुबॉम्बच्या टांगत्या तलवारीच्या झोपाळ्यावर झोके घेत आहे.


