उपक्षम रामटेके/शुभम गजभिये…
ग्रामीण विकास मंत्रालयाच्या परिपत्राकानुसार पंचायत समितींच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासक व प्रशासक समितीचे सदस्य आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले.
या अधिकारा नुसार चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून सरपंच यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रशासक समितीत उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश करण्यात आला आहे.
ज्या ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर त्या ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरु ठेवण्यासाठी प्रशासकाची नेमनूक केली जाते.
यावेळी प्रशासक म्हणून ग्रामपंचायत सरपंच यांना प्रशासक म्हणून तर प्रशासक समितीत उपसरपंच व सदस्य यांना संधी देण्यात आली आहे.त्यांना ग्रामपंचायतीच्या पुढील निवडणुकापर्यत ग्रामपंचायतीचे लोकहितासाठी व विकासासाठी कामकाज सुरळीत पार पडावी लागणार आहेत.
मात्र,प्रशासक आणि प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या परिपत्राकानुसार कामकाज पार पाडावे लागणार आहे.
प्रशासक आणि प्रशासकीय समितीच्या सदस्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्षेत्रिय अधिकारी म्हणून विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या चिमूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
सविस्तर माहिती खालील परिपत्रकात...








