प्रत्येक धर्मात रोडी परंपरा सण वार आहेत, त्यांची उत्पत्ती आणि अर्थ काही जरी असला तरी वर्तमान परिस्थितीत त्यांचा आशय आपल्या जीवनाच्या प्रगतीशी अनुकूल होईल असा लावता येतो किंवा लावला पाहिजे. कारण जे पारंपारिक सण आहेत, केसर म्हणजेच उत्सव आहेत, उत्सव याचा अर्थ आनंद द्विगुणित करणे होय. विचारातील आनंद किंवा मनातील आनंद हा दाखवायचा असतो म्हणजेच त्याची अभिव्यक्ती करायची असते, आनंदाची अभिव्यक्ती म्हणजेच नृत्य गायन चित्र शिल्प ही त्याची माध्यमे आहेत, याद्वारे आनंद व्यक्त करता येतो किंवा होऊ शकतो. आणि ही कृती केल्याशिवाय माणसाला समाधान मिळत नाही. आनंदाची कृती म्हणजेच अभिव्यक्ती म्हणजेच समाधान होय. प्रत्येक सण हे माणसाला निराशा दुःख यातून थोडे बाहेर काढण्यासाठी, थोडा विरंगळा मिळण्यासाठी, थकलेल्या बुद्धीचे थकलेल्या मनाचे चार्जिंग होण्यासाठी अशी ही अनेक सण उत्सव ची परंपरा आपल्या देशात आहे, प्रत्येक सणाच्या दिवशी विशेष जेवण, आवडीचे जेवण, गोड तिखट जेवण,नवीन कपडे,डान्स,गायन,नाटक,खेळ,कुस्त्या,असे अनेक उपक्रम जी आनंद निर्माण करतात,त्यांची अभिव्यक्ती होत असते.यातून आनंद तर मिळतोच,त्याच बरोबर शारीरिक थकवा जरी आला,तरी त्यातून मानसिक समाधान मिळते.जे माणसाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
अनेक सणापैकी रंगपंचमी हा एक सण, जो शिमगा म्हणून ओळखला जातो. या दिवशी लहान मुले मोठी माणसे म्हातारी माणसे सुद्धा स्त्री पुरुष सारेजन एकमेकावर रंग टाकण्यात किंवा एकमेकाला रंग फासण्यात आनंद मिळवित असतात. विशेषतः आपल्या प्रिय व्यक्तींना रंग लावण्यात विशेष आनंद मिळत असतो, आत्मभान ठेवून सर हृदय पणे खेळली जाणारी ही रंगपंचमी माणसाला विशेष सुख आनंद आणि समाधान देत असते, लावणारा आणि लावून घेणारा या दोघां मधील उत्कट प्रेम द्विगुणीत होत असते, ते प्रदर्शित होत असते, प्रेमाची अभिव्यक्ती केल्याशिवाय एकमेकांना समाधान आणि शांती मिळत नाही. खरे तर प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजेच ही रंगपंचमी होय, असे म्हणणे उचितच होईल.
हल्ली चंगळवादी जीवन पद्धतीत नशिले पदार्थांचे सेवन होत असल्यामुळे या रंगपंचमीला कुरूपता येत आहे, यामुळे या सणा चा अर्थ आणि असे बदलून जात आहे, आणि उद्देश पण साध्य होत नाही, शिवाय अनेक समस्या निर्माण होताना दिसतात, झगडे भांडण मारामाऱ्या होताना दिसतात, असे घडणे म्हणजे माणसाचा पराभवच होय. ज्या नीती मूल्यांनी रंगपंचमीचा सण साजरा व्हायला पाहिजे, तीच किती मूल्य जपणे आवश्यक आहे. प्रेम सुख शांती आनंद समाधान सहजीवन ही मूल्य प्रत्येक द्वारे जोपासायची असतात.
रंगपंचमीचे अजून एक वैशिष्ट्य हे की, हा सण माणसाला अशी शिकवण देत असतो की, जीवन हे निर्जीव न बनता सजीव बनविले पाहिजे, वृक्ष जीवन न जगता जीवनात आनंद निर्माण केला पाहिजे. जीवनात हिरवळ निर्माण केली पाहिजे.
मानवी जीवन म्हणजे केवळ आऊटलाईन असलेले एक चित्र होय, मग ते पक्षाचे असे की प्राण्याचे असे की वृक्षाचे असेल की मानवाचे असेल, आऊटलाईन असलेले एखादे पक्षाचे झाडाचे प्राण्याचे माणसाचे चित्र आहे, त्यात विविध रंग भरल्याशिवाय हुबेहूब चित्र दिसणार नाही, म्हणजे च जिवंतपणा दिसणार नाही. ऑफलाइन असलेल्या चित्रात जेव्हा अनेक रंगाचा उपयोग करून ते चित्र रंगमय केल्या जाते तेव्हा ते हुबेहूब प्राणी असो की वृक्ष असो की पक्षी असो की माणूस असो तो दिसत असतो. जसे सजीव जीवनात च्या आउटलाइन मध्ये अनेक रंग भरल्यानंतर ते उभे उभे जिवंत चित्र दिसते, त्याचप्रमाणे अनेक निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा अनेक रंग भरले म्हणजे ते सुद्धा हुबेहूब चित्र दिसते, म्हणजे प्रत्यक्षात जशी आहे तशी दिसत असते.
नेमके हाच संदेश रंगपंचमीचा हा सण देत असतो, केवळ आऊटलाईन असलेले हे आपले जीवन, यात रंग भरल्याशिवाय जीवन सुंदर होणार नाही, जीवन सुंदर करणे म्हणजेच जीवनात प्रेम आनंद सुख शांती समाधान याचा आस्वाद घेणे किंवा प्रचिती येणे होय. हा आस्वाद आणि प्रचिती अशा सणाद्वारे च मिळतो किंवा येते. म्हणून सन साजरे करायचे असतात, याची सत्यता माणसाला कळली असल्यामुळे माणसांनी सणवार करणे कधीच सोडले नाही, आणि सोडणारही नाहीत, कारण माणूस हा निसर्गतःच उत्सव प्रेमी आहे, आणि आनंद सुख शांती ही त्याची नैसर्गिक गरज आहे. ही गरज अशा सणाद्वारे पूर्ण होत असते, म्हणूनच पिढ्यान पिढ्यापासून माणूस सण वार साजरे करीत आलेला आहे.
अर्थात या सणांची निर्मिती कशी झाली? या सणांचा अर्थ काय? या प्रश्नाच्या शोधात न पडता, या सणातून माणसाला आनंद प्रेम शांती समाधान मिळत असेल तर, वर्तमान परिस्थितीत या संवाद सण आणि वारांचे अन्वयार्थ बदलणे आवश्यक आहे, उत्पत्तीची कारणे काही जरी असली तरी, हे सण आपणास अपायकारक नसतील, उपकारक असतील, यामुळे माणसाचे जीवनात जर हिरवळ निर्माण होणार असेल तर अशा सणांचा हेतू आणि अर्थ आपण बदलले पाहिजेत, आणि बदललेले हेतू आणि अर्थ पुढील पिढीला सांगणे जरुरीची आहे. अशा सणांची उत्पत्ती त्याचे कारणे, उद्देश जर चुकीचे असतील, तर त्यातच कवटाळून न बसता, हे सणवार जर आपल्या उपयोगाची असतील, जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या असतील, आणि या सणांची उत्पत्ती कारणे अर्थ जर दुःखदायी असतील, तर ती विसरून या सणांचा इतिहास विसरून नवा इतिहास निर्माण केला पाहिजे. वर्तमान काळानुरूप मानवी गरजा लक्षात घेऊन सणांचे नव्याने अर्थ लावणे आवश्यक आहे.


