लक्षवेधी
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तालुकातंर्गत ग्रामीण भागात देशीविदेशी दारुचा होणारा मोठ्या प्रमाणातील पुरवठा चिंताजनक असून देशी विदेशी दारुच्या अवैध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन व चालना देणारा ठरत आहे.
यामुळे देशी विदेशी दारु पुरवठ्यावर आळा घालण्यासाठी पोलिस विभागाने सतर्क व कर्तव्यदक्ष असणे आवश्यक असताना,त्यांचे अवैध देशी विदेशी दारु पुरवठ्याकडे होणारे दुर्लक्ष कमालीचे गंभीर आहे तथा गुन्हेगारी समाज घडविण्यासाठी सार्थकी ठरत आहे…
पोलिस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे चिमूर तालुकातंर्गत ग्रामीण भागात देशीविदेशी दारुचा महापुर वाहतो आहे.यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात व्यशनाधिनतेला बळी पडत आहेत आणि नवतरुणांचे दारु व्यसनाधीनतेकडे लक्ष वळत आहे.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होणारा देशी विदेशी दारुचा पुरवठा कुठुन होतोय आणि कोण पुरवठा करतोय,याचा शोध घेणे पोलिस विभागाचे काम आहे.
याचबरोबर अवैध देशी विदेशी दारु व्यवसायाच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या,”देशी विदेशी दारु दुकानदारांवर,देशी विदेशी दारूचा पुरवठा करणेवाल्यां अवैध व्यवसायीकांवर आणि देशी विदेशी दारुचा अवैध व्यवसाय करणेवाल्या इसमांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे असे मत सामान्य नागरिकांचे,महिला-पुरुषांचे आहे.
तद्वतच जे देशी-विदेशी दारु परवानाधारक,”ग्रामीण भागात देशीविदेशी दारुचा पुरवठा करतात त्यांच्या दुकानाचे परवाने रद्द करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाकडे अहवाल सादर केला पाहिजे या मताची जनता आहे..
मात्र,ग्रामीण भागात देशीविदेशी दारुचा होणारा मोठ्या प्रमाणात पुरवठा हा पोलिस विभागाच्या दुर्लक्षितपणाचा भाग असल्याने ते आपल्या कर्तव्यात कसूर करतात असे म्हणावे लागेल.
नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची असताना तेच दारु सारख्या अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करतात,हा त्यांचा कर्तव्याचा कोणता भाग आहे हे चिमूर तालुक्यातील महिला-पुरुषांना त्यांच्याद्वारेच कळायला पाहिजे..
चिमूर तालुकातंर्गत ग्रामीण भागात देशी विदेशी दारु दुकानदार परवानाधारकांचा, देशी विदेशी दारु पुरवठा करणाऱ्या गैरकायदेशीर व्यवसायीकांचा आणि दारु विकणाऱ्या इसमांचा,सर्व समाज घटकातील मनावर गंभीर परिणाम पाडणारा धुडगूस हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याने,”पोलिस विभागाला,तो मान्य आहे काय?



