उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे मूल येथील माॅ दुर्गा माता सभागृहात आयोजित जनसेवक सन्मान सोहळा २०२६ व प्रा.महेश पानसे यांचा अनिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक निलेश सोमानी होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष एकताताई समर्थ,उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले,चंद्रपूर जिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.बंडू रामटेके,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे,विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव,नागपूर जिल्हाध्यक्ष शेंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रा.महेश पानसे यांचा केक कापून वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.पत्रकार संघाच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मूल नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष,उपाध्यक्ष,सभापती आणि नगरसेवक यांचा पत्रकार संघाच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच शैक्षणिक,समाजकार्य आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर शानदार कार्यक्रमाचे आयोजन राज्य पत्रकार संघ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा शाखा व दोन्ही जिल्ह्यातील तालुका शाखांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा संघटक रुपचंद धारणे यांनी केले आणि कार्यक्रमाचे सुंदर संचालन मुनिराज कुथे यांनी केले,तर आभार ॲड.राहुल थोरात यांनी मानले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
खालील मान्यवर व्यक्तींचा ३ पुरस्कारातंर्गत करण्यात आला सन्मान…
“जनसेवक सन्मान” प्राप्त…
सौ.एकताताई समाज नगराध्यक्षा मूल,सौ.नलिनीताई अडपवार सभापती न.प. मूल,सौ.ललिताताई फुलझेले सभापती न.प.मूल,सौ.समिक्षा कडस्कर उपसभापती न.प.मूल,श्री.मिलींदजी खोब्रागडे माजी सभापती न.प.मूल,डॉ.तिरथ उराडे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय मूल,चंद्रशेखर अडगुनवार माजी सैनिक,गजेंद्र रायपुरे तहसील कार्यालय मूल…
गुरूवर्य “सन्मान….
अशोक झाडे सर माजी प्राचार्य,अविनाश जगताप सर मुख्याध्यापक सुभाष विद्यालय मूल…
दर्पणकार स्मृती” सन्मान….
आशिष घुमे संपादक,विजय सिदधावार संपादक,प्रविण बत्की जिल्हा प्रतिनीधी दै.महासागर,सुनील बोकडे जिल्हा प्रतिनीधी दै.लोकमत टाईम्स,मनिष रक्षमवार जिल्हा प्रतिनीधी NDTV.,विनोद पन्नासे मुख्य वितरक तथा संपादक,गिरीश नवघडे पत्रकार,चिमूर तालुका अध्यक्ष केवलसींग जुनी,विलास मोहीणकर पत्रकार चिमूर….




