प्रदीप रामटेके
मुख्य संपादक…
नौकरी म्हणजे काय व नौकरी अंतर्गत कर्तव्य म्हणजे काय? हे ज्यांना कळतय,”तेच, दारुच्या पार्ट्या खुलेआम करतात व रात्रोच्या वेळी रेती भरलेले ट्रॅक्टर पकडून हजारो रुपये घेतात व रुपये भेटले की तेच रेती भरलेले ट्रॅक्टर सोडून देतात,हा घटनाक्रम आता दबक्या आवाजात लोकचर्चेचा विषय जांभुळघाट बिटात बनला आहे…
एकीकडे अवैध व्यवसायाला चालना देत नाही म्हणायचे व दुसऱ्या बाजूने अवैध व्यवसाय जोमाने सुरू ठेवायचे हा प्रकारच नागरिकांसी व स्वतःच्या कर्तव्यासी धोकेबाजी करणारा आहे.
मात्र,जांभुळघाट बिटात होणाऱ्या त्या दारुच्या पार्ट्यांची चर्चाच चर्चा सुरु आहे.याचबरोबर रेतीचे ट्रॅक्टर पकडून हजारो रुपये कमावण्याचीही चर्चा सुरू आहे.
ते खुलेआम दारुच्या पार्ट्या करणारे व रेती भरलेले ट्रॅक्टर सोडून देणारे खुपच बेडर असतील काय?हा प्रश्न चिंताजनक आहे…



