Home Maharashtra संविधान सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्यासंबंधाने सिईओकडे सरपंच लोकनाथ रामटेके यांनी केली मागणी…

संविधान सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्यासंबंधाने सिईओकडे सरपंच लोकनाथ रामटेके यांनी केली मागणी…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

      चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिड.) येथे संविधान सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्यासंबंधाने सरपंच लोकनाथ रामटेके यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.

        मौजा सावरी (बिड) येथील नागरिकांना सांस्कृतिक व इतर कार्यक्रमाकरिता सभागृहाची आवश्यकता आहे.या अनुषंगाने सरपंच लोकनाथ रामटेके यांनी संविधान सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

          मौजा सावरी (बिड) येथे संविधान सभागृहाचे बांधकाम मजूर करण्याच्या मागणीकडे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे आवर्जून लक्ष देणार,असा सकारात्मक दृष्टिकोन सरपंच लोकनाथ रामटेके यांचा आहे.

      सरपंच लोकनाथ रामटेके यांनी सिईओ चंद्रपूर यांच्याकडे संविधान सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्यासंबंधाने केलेली मागणी सांस्कृतिक कार्यक्रमाला अनुसरून असल्याने चंद्रपूर सिईओ सदर मागणी गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा सरपंच यांना आहे.