सैय्यद ज़ाकिर
उपसंपादक…
दखल न्यूज भारत…
वर्धा श्रमिक पत्रकार संघच्या वतीने दरवर्षी मराठी पत्रकार दीनी दिल्या जाणाऱ्या चौथा स्तंभ पुरस्कारांच्या मानकरीची निवड करण्यात आली.
मंगळवार 6 जानेवारीला सकाळी 11 वाजता स्थानिक संत दादाजी धूनीवाले देवस्थान सभागृहात आयोजित समारंभात मान्यवराचा हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
स्व.वामनराव दिवे ट्रस्टचा सिंचन व शेती क्षेत्र पुरस्कार सुरेश पाटिल (हडद गांव) यांना जाहिर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपते स्मृति पत्रकारिता पुरस्कार मनोज भोयर (मुंबई),बबीबाई नंदकिशोर जावघीया स्मृति पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी नंवले (साहुर )या विद्यार्थीनिला प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकार प्रा.डा.प्रवीण वानखेड़े स्मृति पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार सूर्य प्रकाश भट्ट (आर्वि ),प्रशांत हेलोडे स्मृति पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार रमेश लोंढे (हींगनघाट),तर मनोज मुने स्मृति पत्रकारिता पुरस्कार वृत्तवाहिनीचे पत्रकार पराग ढोबले (नागपूर) यांना,तर आदर्श पालक सम्मान पुरस्कार मनोहर मुड़के (वर्धा) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या सर्व पुरसकारांचे स्वरूप रोख रक्कम,शॉल,श्रीफल आणि पुष्प गुच्छ असे आहे.मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .



