Home Social गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकारी द्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती...

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकारी द्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

       गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

                क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

          तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले. 

       कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष डॉ.सौ.सोनलताई कोवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.जेसाभाऊ मोटवानी याचा सत्कार नारद व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले..

         क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाप्रसंगी सौ.विनाताई जम्बेवार,सौ.सुनीताताई साळवे,अँड.सौ.कविताताई माहोरकर,डॉ.सौ.प्रियांकाताई शेडमाके,राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली तालुका अध्यक्ष श्री. विवेक बाबनवडे,श्री.किशोर बावणे,श्री.किशोर शिंगाडे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सौ.सुषमाताई येवले,आरमोरी विधानसभा कार्याध्यक्ष सौ.वृषालीताई भोयर,शहर अध्यक्ष श्री.अमोल कुलमेथे,शहर अध्यक्षा लोमेश्वरीताई वासेकर,उपाध्यक्ष सौ.प्रतिभाताई कुंभारे,जिल्हा सरचिटणीस सौ.अर्चनाताई निमसरकर,ओबीसी तालुका अध्यक्ष सौ.आशाताई मुळेवार,जिल्हा सचिव संघटन सचिव सौ.उमाताई बनसोड,सौ.अंजुमताई सैय्यद,माधुरीताई मंगरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थितीत होते..