Home Maharashtra दारूच्या पैशांच्या वादातून चिमूर येथे युवकाचा खून….

दारूच्या पैशांच्या वादातून चिमूर येथे युवकाचा खून….

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी.. 

     शुभम गजभिये 

         विशेष प्रतिनिधी…

              दिनांक 3 जानेवारीला शनिवारच्या रात्री अज्ञात मारेकर्‍यांनी खून करून नेहरू शाळेच्या मागील परिसरात फेकून देण्यात आला होता.

        मृतकाचे नाव आकाश प्रभाकर उताने वय ३१ वर्षे राहणार तनीस काॅलनी,ठक्कर वार्ड चिमूर असे आहे.सदर युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आज रविवारला सकाळी आढळून आल्याने चिमूर शहरात खळबळ उडाली.

        चिमूर पोलिसांनी तपासाची चक्र अतीवेगाने फिरवुन अवघ्या तीन तासात तीन आरोपींना अटक केली. 

        मृतक आकाश उतानेची आई उषा प्रभाकर उताने यांचे आज रविवारला दिलेल्या फिर्यादीवरून चिमूर पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन घटना स्थळ पंचनामा केला व प्रेत उत्तरणीय तपासणी करिता उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले.

         पोलीसांच्या प्राथमिक अंदाजा नुसार दारू पिण्यासाठी पैसे देण्याच्या वादातून मित्रांनीच डोक्यावर दगडाने वार करून आकाश प्रभाकर उताने यांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. 

              फिर्यादीवरून पोलिसांनी अप.क्र. 02/२०२६ कलम 103 (1) बिएनएस (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

               घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे,आणि पो.नि.दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक तयार करण्यात आले. 

      सपोनि.ताळीकोटे,पोउपनि.देरकर,पोहवा.सचिन साठे, प्रमोद पढाल,प्रमोद पिसे,सोनू मोहुर्ले,पो.अं.सचिन खामनकर,रोहित तुमसरे,फाल्गुन परचाके,रुपेश शामकुळे,विकास बारसागडे,गणेश वाघ,सोनू येलकुचेवार आदींच्या पथकाने कारवाई केली. 

            पथकाने अतिशय शिताफीने तपासाची सूत्रे हलवत,शहरातील तांत्रिक माहिती,गोपनीय खबर व स्थानिक चौकशीच्या आधारे अवघ्या 3 तासात आरोपींचा शोध घेत गुन्हा उघडकीस आणला.

             पोलिसांनी संशयित आरोपी सुजल विलास सोनवाने (वय २०) ,छगण मोहन दिघोरे (वय २७),अनिकेत शेषराव साखरकर (वय २४),तिन्ही रा. नेताजी वार्ड,चिमूर या आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.