Home Maharashtra नरभक्ष वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी केवळ आश्वासन देऊन चालणार नाही,तर कृती करा… ...

नरभक्ष वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी केवळ आश्वासन देऊन चालणार नाही,तर कृती करा… — असा सज्जड इशारा उपसरपंच अशोक चौधरी यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

      आज दिनांक 06 नोव्हेंबर 2025,भवानी चौक,शंकरपूर येथे वाघाच्या बंदोबस्त साठी चक्का जाम आंदोलनात शेकडो शेतकरी व गावकरी सहभागी झाले होते.

          गेल्या दीड महिन्यात आपल्या परिसरात वाघाने तीन जीव घेतले.वन विभागाच्या दुर्लक्षामुळे आपली सुरक्षा नाकारली जात आहे.हे दुर्लक्ष नाही तर हे जनतेसोबत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी शुध्द खेळ खेळत असल्याचा गंभीर आरोप उपसरपंच अशोक चौधरी यांनी मार्गदर्शन करताना आंदोलन स्थळी केला आहे.

       आपल्या गावात वाघांच्या हालचाली दिवसेंदिवस वाढत आहेत.रात्री लोक घराबाहेर पडायला घाबरतात, पशुपालक,शेतकरी,नागरिक,विद्यार्धी आणि शेतमजुरी हे मृत्यूच्या दाढेत अडकले आहेत.

           छोट्या बालकांपासून आजीपर्यंत कोणतेही नागरिक सुरक्षित नाही.आता आम्ही मागे हटणार नाही.

       गेल्या एक महिन्यापासून आम्ही वारंवार आणि सभ्य पद्धतीने वन विभागाकडे बंदोबस्त मागितला आहे.परंतु आजपर्यंत कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही.

       आश्वासनापेक्षा कृती हवी.फक्त गप्पाशिवाय आणि फक्त शस्त्राशिवाय आम्ही आपली मागणी मांडत आहोत.तातडीने आणि प्रभावीपणे वाघाचा बंदोबस्त करावा.

आंदोलन कर्त्यांनी खालील गोष्टी तात्काळ करण्याची मागणी केली आहे…

1. त्वरित,अनुभवी पथक पाठवून वाघाचा शोध व सुरक्षित पकड करावी.

2. गावात रात्रीचे पेट्रोल आणि सतर्कता वाढवावी,सार्वजनिक जागी दिवे व सुरक्षा व्यवस्था करावी.

3. प्रभावित कुटुंबांना तात्काळ सूटका व नुकसान भरपाईची व्यवस्था करावी.

4. वनविभागाने पुढील तीन दिवसांत स्पष्ट लिखित कारवाईची घोषणा करावी.. — अन्यथा आम्ही आपले आंदोलन तीव्र करणार आहोत.

       ही मागणी वैयक्तिक नव्हे ही जनतेच्या जीवाची मागणी आहे.प्रशासनाला आम्ही अंतिम इशारा देतो आहे,”आता फक्त शब्द नको — प्रत्यक्ष कृती हवी. जर त्वरित उपाय झाले नाहीत, तर शेतकरी,महिला व युवक सर्व मिळून कायदेशीर आणि शांत परंतु प्रभावी पद्धतीने आंदोलन वाढवू असा गर्भित इशारा सुध्दा उपसरपंच अशोक चौधरी यांनी दिली.

        आता वेळ आहे आपली सुरक्षा,आपल्या मुले व आपल्या पशूंचे जीव वाचवण्याची.चला एकत्र उभे राहू आणि न्याय मागू,असे उपस्थित आंदोलनकर्त्यांना आवर्जून सांगितले व खालील प्रमाणे विशेष मागण्या रेटून धरल्यात..

    १) “वाघाचा बंदोबस्त नाही तर आंदोलन!”

    २) “आमच्या प्राणांची रक्षा करा — वाघ पकडा!”

     ३) “आश्वासन नव्हे, कृती हवी!”

     ४) “शंकरपूर सुरक्षित पाहिजे — लगेच कार्यवाही करा!”