Home Maharashtra टिआरजी कंपनी संचालकांकडून दिव्यवंदना आधार फाउंडेशनला राशन व फ्रुटचे दान!

टिआरजी कंपनी संचालकांकडून दिव्यवंदना आधार फाउंडेशनला राशन व फ्रुटचे दान!

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

    TRG कंपनी संचालकांकडून चिमूर तालुक्यातील मौजा जामगाव (कोमटी) येथील दिव्यवंदना आधार फाउंडेशनला राशन व फ्रुट दान करण्यात आले. 

        श्री.विशाल श्रावणजी आडे,जांभूळघाट यांच्या मार्गदर्शनाखाली हा चारिटी इव्हेंट कार्यक्रम नुकताच पार पडला. 

          दिव्य वंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम दादा पसारकर यांनी TRG कंपनीच्या संचालकांचे आणि उपस्थितांचे धन्यवाद मानले व तुम्ही दिव्य वंदना आधार फाउंडेशनच्या पाठीशी सदैव राहावे असी अपेक्षा व्यक्त केली.

            दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारे रोडवरील बेघर,बेवारस,भिक्षेकरी,निराधार, अनाथ,मनोरुग्ण,यांचे योग्य संगोपन पुनर्वसन केंद्र व वृद्धाश्रम,जामगाव (को),ता.चिमूर,जि.चंद्रपूर येथे केले जात आहे.

          याच पुनर्वसन केंद्र व वृध्दाश्रम मध्ये दिनांक २९/०९/२०२५ ला चारिटी कार्यक्रम टिआरजी कंपनी संचालकांद्वारे आयोजित केले होते.या चारिटी कार्यक्रमात वृद्धाश्रमातील 50 स्त्रि-पुरुष आणि टिआरजी कंपनीचे संचालकासह इतर 20 जणांनी सहभाग घेतला होता.

      चारिटी इव्हेंट कार्यक्रमात विशाल आडे (प्रोजेक्ट डायरेक्टर),रितिक भजभुजे,प्रवीण नेवारे,हुकूमतसिंग जुनी,ईश्वर मसराम,कुणाल निवटे,आदीश नागोसे,गिरी निवटे,दादू भजभुजे,महादेवसिंग जुनी,गौरव मेश्राम,सर्वेश शेनमारे,हर्षल तरारे,केशव मुंडरे,हेमंत टेकाम,काना खेडेकर,सुरज देवारे,अजय मेश्राम,कपिल मेश्राम,गितेश मेश्राम,अविनाश तरारे यांचा सहभाग होता.