Home Maharashtra शेतकऱ्यांच्या व जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी राजूरा येथे निघाला जनआक्रोश मोर्चा! —...

शेतकऱ्यांच्या व जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी राजूरा येथे निघाला जनआक्रोश मोर्चा! — खासदार प्रतिभा धानोरकर,जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली समस्याग्रस्तांचा निघाला प्रचंड मोर्चा..

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

    चंद्रपूर तालुक्यातील शेतकरी,आदिवासी बांधव,तरुणाई,विद्यार्थी असे सर्वच घटक शासनाच्या उदासीन धोरणामुळे व्यथित झाले आहेत.

       यामुळे समाजातील या सर्व घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी,सर्वांच्या न्याय हक्कांसाठी राजुरा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने भवानी मंदिर ते तहसील कार्यालय असा भव्य जनअक्रोश मोर्चा काढण्यात आला.

         सर्व मागण्यांचे एकत्रित निवेदन संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार असा निर्धार यावेळी व्यक्त केला.

        यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षआ.श्री.सुभाष धोटे, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासह सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.