कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारसिवनी..
सर्वधर्म समभाव संघटन कन्हान द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले होते.कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे,अशोक पाटील यांनी महापुरुषांच्या जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.बुंदी वितरित करुन धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कैलास भिवगडे,नितिन मेश्राम,चिराल वैद्य,हरिष इंगोले,राॅबीन निकोसे,किशोर यादव,अक्षय फुले सह आदि नागरिक उपस्थित होते.



