Home Social शिवा संघटना महाराष्ट्र अन्वये भंडारा जिल्हाध्यक्षपदी आशिष चेडगे..‌. — जिल्हा सोशल...

शिवा संघटना महाराष्ट्र अन्वये भंडारा जिल्हाध्यक्षपदी आशिष चेडगे..‌. — जिल्हा सोशल मिडिया पदावर छत्रपती संभाजीनगर वरून निवड..‌. 

निलय झोडे 

  उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

साकोली :- अखिल भारतीय वीरशैव लिंगायत,”शिवा” संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या आदेशान्वये,राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावार यांच्या मार्गदर्शनात आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष “शिवा संघटना” सोशल मिडीया मनिष पंधाडे यांनी एक भक्कम,जोशपूर्ण व तडफदार, उद्याच्या परिवर्तनाचा प्रतिनिधी होणा-या आशिष चेडगे या तरूणाची,”शिवा संघटना सोशल मिडिया भंडारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. 

       तरुण तडफदार व भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे पत्रकार आशिष शरदराव चेडगे यांची ( शनिवार २७ सप्टेंबर ) ला छत्रपती संभाजीनगर वरून “शिवा” संघटनेच्या भंडारा जिल्हा सोशल मिडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

             या नियुक्तीद्वारे भंडारा तसेच गोंदिया जिल्ह्यातील शिवा संघटनेच्या कार्याला नवा वेग,नवी दिशा आणि तरुणाईची शक्ती मिळणार आहे हे नक्की!..

     शिवा संघटनेच्या माध्यमातून संघटनात्मक व सामाजिक कार्यात आपले योगदान देऊन समाजासाठी खऱ्या अर्थाने लढा द्या असे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी कळविले आहे. 

       नवनियुक्त जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष आशिष चेडगे यांना समस्त शिवा संघटना शाखा महाराष्ट्र राज्याच्या वतीने,तसेच भंडारा जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाच्या तुमसरचे माजी नगराध्यक्षा गिताताई कोंडेवार,सराफा व्यापारी शिवाजी आप्पा कथले,पवनीचे अनिल विश्वेकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश चेडगे,दिलीप दर्यापूरकर,संजय विश्वेकर,जयंत चेडगे,साकोलीचे राहुल अंदूलकर,प्रशांत चेडगे,सेवानिवृत्त महसुल लिपिक अश्विनी शेटे लाखनी,से.नि.अन्न व औषधी निरीक्षक विनोद अंदूलकर,निखील अंदूलकर,आशिष दलाल,आदित्य चेडगे,रवि लोखंडे,जितेंद्र पांडे,अभिजीत अंदूलकर,प्रदीप दर्यापुरकर,अतुल दलाल,राजा कोमलवार,मनिष कापसे,विनोद कापसे,संजय ठोंबरे,अनिल एम्पतवार व भंडारा गोंदिया,अमरावती,नागपूर जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी नवनियुक्ती बाबत आशिष चेडगे यांचे अभिनंदन केले आहे…