रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर : गांधी सेवा शिक्षण समिती, चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी कनिष्ठ महाविद्यालय, चिमूर येथील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला उजाळा दिला आहे.
यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल 81.92 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी कला व वाणिज्य शाखेत उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे.महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 86.40 टक्के तर कला शाखेचा निकाल 74.60 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कला शाखेमध्ये श्री.रितिक गुलाब जीवतोडे याने 77.00 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु.साक्षी देवाजी गुरनुले हिने 76.83 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. वीणा वसंता औतकार हिने 73.83 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य शाखेमध्ये कु.शृंगार बालाजी लोणबले हिने 84.67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.श्री. प्रणव तेजराम लांडे याने 81.33 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला, तर श्री.हरिओम प्रेमदास राऊत याने 80.17 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी विविध श्रेणींमध्येही उल्लेखनीय यश मिळविले आहे. प्राविण्य श्रेणीत 05 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत 23 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 61 विद्यार्थी तसेच पास श्रेणीत 47 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गांधी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव प्रा.मारोतराव भोयर कोषाध्यक्ष प्रा महादेवराव पिसे तसेच संस्थेचे सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य कॅप्टन डॉ. प्रफुल बन्सोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राकेश कुमरे, प्रा. गुणवंत वाघमारे, प्रा. रोशन कुमरे, प्रा. रीना गाडगे, प्रा. निलीमा तुराणकर, प्रा. गजानन चव्हाण, प्रा. रोकडे सर, प्रा. अमर ठवरे, प्रा. रामटेके मॅडम तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश प्राप्त झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.लेखनीय यश संपादन करून शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश प्राप्त झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



