राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक विद्याभारती कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवीत कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98.55 % लागलेला आहे.
विद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेला 69 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी 68 विद्यार्थी पास होऊन उज्वल निकालाची परंपरा मागील अनेक वर्षांपासून कायम राखली.
प्रथम क्रमांक हर्षद संजय फुलबांधे याने पटकाविलेला असून सायली शीतकुरा गाडगोणे द्वितीय तर मंथशा सिराज पठाण तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.
महाविद्यालयातील प्राचार्यांचे व प्राध्यापकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन, महाविद्यालयात होणारे नियमित वर्ग, नियमित चाचण्या ,डिजिटल वर्ग खोल्या,अद्यावत प्रयोगशाळा, महाविद्यालयात मिळणाऱ्या विविध सोयी- सुविधा, समृद्ध ग्रंथालय ,ग्रंथालयात असणारे विविध पुस्तके व संदर्भ ग्रंथे, महाविद्यालयातील मोफत वायफाय, यामुळेच हे यश प्राप्त करता आले असे विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे , विभाग प्रमुख प्रा.शैलेश हडप, वर्ग शिक्षक प्रा.सुभाष घोंगडे, प्रा.तिरुपती बोरकर, प्रा.हरीश बावनथडे, प्रा.पी. के. बनसोड, प्रा.प्रियंका उईके यांना दिलेले आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे ,संस्थेचे सर्व सन्माननीय कार्यकारणी मंडळ, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेले आहे.



