भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
संपूर्ण भारतभर जनगणना 2027 मोहीम शासनाने सुरू केले असून देशातील प्रत्येक नागरिकास स्वतःची गणना करण्यासाठी एक मे 2026 ते 15 मे 2026 हा कालावधी देण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नगरपंचायत धानोरा तर्फे आज दिनांक 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्व गणना मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा नगरपंचायत धानोरा सौ पौर्णिमा भास्कर सयाम यांच्या हस्ते स्व गणना करून सुरुवात करण्यात आला.
नगराध्यक्ष सौ.पौर्णिमा संयम यांनी नागरिकांना स्व गणनेचे महत्त्व पटवून देत प्रत्येक कुटुंबाने अचूक व प्रामाणिक माहिती नोंदवावी असे आवाहन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, स्वगणना ही जनगणना प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी असून यामुळे शासनाला अचूक माहिती मिळवून विविध योजना प्रभावीपणे राबवता येतात. नागरिकांनी मोबाईल ॲप किंवा ऑनलाईन प्रणाली द्वारे स्वतःची गणना पूर्ण करावी तसेच इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करावे असेही त्यांनी म्हणाले.
नगरपंचायत प्रशासनाने या मोहिमेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली असून, नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत स्वगणना मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



