Home Maharashtra १ मे महाराष्ट्र दिनी पहिल्यांदाच धानोरा येथील तहसील कार्यालयात आमदार मिलिंद नरोटे...

१ मे महाराष्ट्र दिनी पहिल्यांदाच धानोरा येथील तहसील कार्यालयात आमदार मिलिंद नरोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण… 

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

        आपल्या राज्याच्या निर्मितीचा हा अभिमानाचा आणि सुवर्ण सोहळ्याचा दिवस व आजच्या या पावन दिवशी तहसील कार्यालय, धानोरा येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

         डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला वंदन करताना आणि महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण करताना मन अभिमानाने भरून आले.

        धानोरा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच आमदारांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणे, ही आपणा सर्वांसाठी व धानोरा वासियांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.

              महाराष्ट्र हा केवळ भौगोलिक सीमा नसून ती एक विचारधारा, संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली एक महान परंपरा आहे.

         संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. 

          यावेळी तहसीलदार गणेश माळी, भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, भाजपा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा जिल्हा सचिव सारंग साळवे, माजी तालुकाध्यक्ष सौ.लताताई पुनघाटे, ता.महामंत्री सुभाष धाईत, नगरसेवक संजय कुंडू, सुभाष खोबरे, राकेश खरवडे, राजेश दास, अनुषयाताई कोरेटी, भाजयुमो तालुकाध्यक्ष सौरव सहारे तसेच भाजपा कार्यकर्ते व विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.