Home Maharashtra अस्वलाला केले पिंजऱ्यात जेरबंद…

अस्वलाला केले पिंजऱ्यात जेरबंद…

      सुधाकर दुधे

तालुका प्रतिनिधी सावली…

      सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड,नियतक्षेत्र गायडोंगरी,अंतर्गत मौजा विरखल चकच्या शेतशिवार व गाव शिवारात मागील चार-पाच दिवसापासून वन्यप्राणी असलेल्या अस्वलाचे अस्तित्व गावकऱ्यांना निदर्शनास येताच याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली.

        मागील चार ते पाच दिवसापासून नियत क्षेत्र वनरक्षक गायडोंगरी व PRT टीम निफंद्रा हे सदरचे अस्वलावर लक्ष ठेवून मागवा घेत होते.

       दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 8.00 वाजता चे दरम्यान गावाजवळ आली असता गावातील लोकांच्या जमावाने आरडाओरड केल्याने भीतीपोटी अस्वल गावालगत असलेल्या चिंचेच्या झाडावर चढून बसली होती.

       अस्वल रात्रभर झाडावरच होती.परंतु पहाटे 5 वाजताचे सुमारास अस्वल झाडावरून उतरून वीरखल येथील श्री.भास्कर लक्ष्मण मारभते यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरली.

       गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या वनकर्मचाऱ्यांनी सदरचे दृश्य बघितले व त्यांनी तात्काळ सदर घराचे दरवाजे बंद केले.

          यानंतर घटनेबाबत वरिष्ठ वनाधिकारी यांना माहिती दिली.विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्वात,श्री.घनश्याम नायगावकर वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर,कु.इंगळे परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी,डॉ.कुंदन पोडचेलवार पशुधन विकास अधिकारी टीटीसी चंद्रपूर,RRU टीम चंद्रपूर यांनी सदरचे अस्वलास शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद केले.

          सदरचे कामी राखुंडे क्षेत्रसहाय्यक व्याहाड,पाटील क्षेत्रसहाय्यक पाथरी,एकनाथ खुडे वनरक्षक गायडोंगरी,वनरक्षक भोला सोनेकर,अविनाश नाने,महादेव मुंडे,डांगे,कराड,सुषमा मेश्राम व PRT निफंद्रा,गवरला,शिरसी व ईश्वर गंडाटे आणि इतर वन कर्मचारी आणि गावकऱ्यांनी अस्वलाला जेरबंद करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

          सदरचे अस्वलास पुढील उपचाराकरिता TTC चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून गावकऱ्यांनी अस्वल पकडल्याने सुटकेचा श्वास घेतला आहे.