Home Maharashtra नेरी येथे बिएसएनएल ची सेवा ठप्प…. 

नेरी येथे बिएसएनएल ची सेवा ठप्प…. 

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

         चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथील भारत संचार निगम लिमिटेडची सेवा ठप्प पडल्याने मोबाईल धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

      नेरी येथे बिएसएनएल चे टाॅवर असुन सुद्धा इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने शोभेची वस्तू ठरली आहे.

    बिएसएनएल चे रिचार्ज मारुन मोबाईल फोन लागत नाही,इंटरनेट सुविधा मिळत नाही.त्यामुळे मोबाईल धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे,परिणामी मारलेला रिचार्ज वाया जात असल्याने मोबाईल धारकात असंतोष निर्माण झाला आहे.

       नेरी,म्हसली,लोहारा येथे बिएसएनएल चे टाॅवर असुन सुद्धा इंटरनेट सुविधा बरोबर मिळत नाही टावर बंद आहे का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

      परिणामी बिएसएनएल ची नेट सेवा वारंवार ठप्प पडत असल्याने,सदर कंपनीचे सिम वापर करणारे मोबाईल धारक जाम वैतागले आहेत 

           त्यामुळे जिओ ची सेवा वापरण्याकडे ग्राहक धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.

        संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष देवून टावर सुरू करून नेट सेवा सुरू करण्यात यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.