Home Maharashtra आंबोली परिसरातील त्या हिस्त्र वाघाचा स्थलांतरन करण्यासंबंधाने बंदोबस्त तात्काळ करा..  —...

आंबोली परिसरातील त्या हिस्त्र वाघाचा स्थलांतरन करण्यासंबंधाने बंदोबस्त तात्काळ करा..  — मागण्या पूर्ण न केल्यास रास्ता रोको ठिय्या आंदोलन” करणार,:- शुभम मंडपे…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

        चिमूर तालुकांर्गत आंबोली,चिचाळा (शास्त्री) लावारी,वाकर्ला,जवराबोळी गडपिपरी,बोरगांव (डोये)पूयारदंड परिसरात १५ दिवसापासून वाघाचा धुमाकूळ चालु आहे.

      दि.१८ सप्टेंबरला मौजा लावारी येथील विद्या कैलास मसराम या महिलेला वाघाने ठार केले होते.त्यामुळे शेतकरी व शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

          अशातच दि.२६/९/२०२५ ला मौजा आंबोली चौरस्ता येथे वाघाने एका गाईला ठार केले व दुपारी २ वाजता मौजा चिचाळा (शास्त्री) येथे विनायक वासनिक यांच्या शेतात वाघाने नीलगायीची शिकार केली व आंबोली परिसरात १५ दिवसापासून सतत वाघाचे दर्शन होत आहे.

        वाघाच्या दर्शनामुळे परिसरातील नागरिकांत खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत आंबोलीचे तडफदार सदस्य यांनी तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा,या संबंधान क्षेत्र सहाय्यक वनविभाग भिसी यांच्याकडे मागणी केली आहे

        यावेळी तीन प्रमुख मागण्या निवेदनातून केल्या आहेत.संपूर्ण वाघाचे स्तलांतरन दुसऱ्या जंगलात करावे,मौजा लावारी गावाच्या सभोवताल तारेचे कंपाउंड करण्यात यावे व आंबोली,चिचाळा (शास्त्री), गडपिपरी,पूयारदंड गावालागतच्या जंगलाला तारेचे कंपाउंड करण्यात यावे याबाबतची मागणी वनविभागाला केली आहे. 

         या सर्व मागण्या पूर्ण न केल्यास वनविभागाला आठ दिवसाची अल्टीमेट देऊन,सर्व परिसरातील शेतकरी व शेतमजुरांना घेऊन आंबोली चौरस्ता येथे “रास्ता रोको ठिय्या आंदोलन” करणार असा इशारा वनविभागाला शुभम मंडपे यांनी दिला आहे.

        यावेळी क्षेत्र सहाय्यक भिसी नैताम यांना निवेदन देतांना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत आंबोलीचे तडफदार सदस्य शुभम मंडपे,ग्रामपंचायत आंबोलीचे उपसरपंच वैभव ठाकरे,राजेंद्र जाधव,योगेश करारे,दिनकर सिनगारे,प्रणयठाकरे,संकेत पारधी,अनंता डोये,सुधाकर कुर्वे,विश्वास रामटेके,आशिष दडमल,विनोद बारेकर,संजय शिवरकर,व आंबोली,लावारी,चिचाळा (शास्त्री)गडपिपरी,पूयारदंड,वाकर्ला जवराबोळी परिसरातील नागरिक आवर्जून उपस्थित होते.