Home Social कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला नागरिकांना व्यायामाचा सल्ला…

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला नागरिकांना व्यायामाचा सल्ला…

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी 

          भरणेवाडी तालुका इंदापूर येथे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकाळी शहरातील एका स्टेडियम मध्ये व उद्यानात फेरफटका मारून सकाळच्या व्यायामाचे महत्त्व तरुणांना सांगितले.

           नियमित चालण्याचा आणि आरोग्य राखण्याचा संदेश नागरिकांना दिला. सकाळी सहाच्या सुमारास कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे साध्या ड्रेसमध्ये टी-शर्ट व नाईट पॅन्ट पोशाखात आसुन स्थानिक नागरिकांशी गप्पा मारत, त्यांनी आरोग्य विषयक ग्रामस्थांना व नागरिकांना सल्ला दिला.

        सकस आहार, नियमित व्यायाम, आणि मानसिक तणाव टाळण्याच्या उपायांवर भर देण्यास सांगितला.

         आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. पण दररोज किमान 40 मिनिटे चालणे हे दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक आहे, आसेही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यायामा प्रसंगी सांगितले.

         कृषिमंत्री भरणे यांच्या अनोख्या उपक्रमाचे अनेक नागरिकांनी इंदापूर तालुक्यात स्वागतही केले.

         ग्रामस्थ यांनी कृषीमंत्री महोदयांसोबत चालण्याचा अनुभव घेत, त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुकही केले.

         या आधीही दत्तात्रय भरणे यांनी वेळोवेळी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करून, निरोगी जीवनशैलीची गरज अधोरेखित केली आहे. आजचा त्यांचा सकाळचा वॉक एकप्रकारे जनतेला प्रेरणा देणारा ठरलेला आहे.