Home Social मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधोपचार शिबिराचा 210 गरजू रुग्णांना मिळाला...

मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधोपचार शिबिराचा 210 गरजू रुग्णांना मिळाला लाभ…. — ब्रह्मपुरी येथील सुप्रसिद्ध मधुमेह, हृदयरोग तज्ञ डॉक्टर भारत गणवीर तसेच बालरोग तज्ञ डॉ.मीतु गणवीर यांनी केली रुग्णांची तपासणी… — संकल्प फाउंडेशन संस्थेचा समाज उपयोगी उपक्रम….

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        गेल्या 8 वर्षापासून संकल्प फाउंडेशन समाजसेवी संस्थेच्या वतीने कुरखेडा तालुक्यात मोफत आरोग्य शिबिराचे निरंतर आयोजन करण्यात येत असून या वर्षी सुद्धा संस्थेच्या वतीने गेवर्धा येथे भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा चे औचित्य साधून दिनांक 30/ 4/ 2026 ला बाबासाहेब आंबेडकर चौक गेवर्धा येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार तसेच मोफत रक्त तपासनी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

         या शिबिराचे उद्घाटन पद्मश्री डॉक्टर परसराम खुणे यांचे हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी गेवर्धा येथील सरपंच सुषमा मडावी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. टीकाराम बोरकर , ग्रामपंचायत सदस्य रोशन सय्यद, त. मु.अध्यक्ष राजूभाऊ बारई , डॉ.जगदिश बोरकर,माजी सरपंच हेमंत सिडाम, आ वी का सदस्य सुधीर बाळबुद्धे, दशरथ लाडे, यादव नाकतोडे,इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

      डॉक्टर भारत गणवीर शतायु हॉस्पीटल ब्रम्हपुरी यांनी महिला पुरुष यांची तपासणी केली.तपासणी दरम्यान मधुमेह, व रक्तदाब असलेल्या रुग्णांचे ईसीजी काढण्यात आले. मधुमेह ,रक्तदाब व हृदय रोगाचे रुग्ण वाढत असल्याने निरोगी आरोग्यासाठी व हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी डॉक्टर भारत गणवीर यांनी रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले. बालरोग तज्ञ डॉक्टर मीतू गणवीर यांनी कुपोषित मुले कमी वजनाची मुले यांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य तो औषधोपचार केले.

         बाळाच्या जन्मानंतर बाळाचे संगोपन व आहार योग्य असेल तर कुपोषणापासून बालकाचा बचाव होतो असे महिलांना मार्गदर्शन केले.आरोग्य तपासणी शिबिरा दरम्यान नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष रवींद्रजी गोटेफोडे .माजी रुग्णकल्याण समिती सदस्य विवेक निरंकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मोनेश मेश्राम, लोकमत वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी सिराज पठाण, पुष्पराज राहंगडाले यांनी भेट देऊन उपक्रमाची प्रशंसा केली.

        आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डॉक्टर जगदीश बोरकर ,डॉ.उमाकांत राउत,डॉक्टर अंकित बोरसरे यांनी इतर रुग्ण महिला, बालक ,नागरिकांची आरोग्य तपासणी केली, शिबिरामध्ये सर्व नागरिकांची मोफत शुगर तपासणी ,ब्लड प्रेशर तपासणी, महा लॅब अंतर्गत लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट ,सी बी सी, लिपिड प्रोफाइल फंक्शन टेस्ट इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.

        तपासणी किशोरवयीन मुले मुली यांची तपासणी ,करून समुपदेशन करण्यात आले तसेच आहाराविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. गेवर्धा ,खेडेगाव, आंधळी, गुरनोली व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.

          आरोग्य तपासणी दरम्यान रक्तदाबाचे 21 मधुमेहाचे 30 रुग्ण, रक्तक्षयाचे 15 ,रुग्ण ,हृदय रोगाचे 05 रुग्ण आढळून आले. शिबिरामध्ये आलेल्या सर्व गरजू रुग्णांना मोफत गोळ्या व औषधी चे वितरण करण्यात आले. शिबिरामध्ये ,महालॅब प्रयोगशाळा तंत्रज्ञ चंद्रदीप बन्सोड , नेहा राऊत ,सौरभ बनपूरकर , भाग्यश्री बोरकर, यांनी रक्त तपासणी चे काम बघितले.रक्तदाब व शुगर तपासणी लीलिमा बोरकर, स्नेहा बोरकर,फलिंद्र मांडवे ,राहुल पाटणकर यांनी केले.

        औषधी वितरणाकरिता औषध निर्माता भूषण बोरकर रामू बोरकर यांनी काम बघितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी संकल्प फाउंडेशन चे मनीष मेश्राम,सुमेध रामटेके,स्नेहाली बोरकर ,गोविंद बोरकर , मुकेश बोरकर नितेश नखाते,विष्णू कांबळे,विजय ढवळे,अतुल अंबादे,बाळाजी नखाते,आकाश डांगे ,साहिल तांबे,हंसराज लोणारे ,यांनी सहकार्य केले.