उपक्षम रामटेके/शुभम रामटेके
कामगार विरोधी चार श्रमसंहितां रद्द करा,जनसुरक्षा विधेयक मागे घ्या या विरोधात आणि कामगार,योजना कर्मचारी यांच्या रास्त मागण्यांसाठी काल देशव्यापी संपाची हाक दिली होती.
त्या अनुषंगाने आयटकचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील आझाद बाग ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात भव्य मोर्चा निघाला.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर करण्यात आले.
त्यात केंद्र सरकारने कामगार विरोधी श्रमसंहिता केलेल्या त्वरित रद्द कराव्यात,श्रमसंहितांच्या अंमलबजावनी महाराष्ट्र शासनाने करू नये,जन सुरक्षा विधेयक आणून संघटनांचा आवाज कष्टकऱ्यांच्या लढा रोखण्यासाठी होऊ शकतो त्यामूळे ते विधेयक रद्द करावे.
१०० वर्षांच्या लढ्यांमधून मोठ्या कष्टाने मिळवून घेतलेले कामगार कायदे रद्द करून तयार केलेल्या कॉर्पोरेट धार्जिण्या,कामगारविरोधी चार श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूचे कायदे करा व त्यांची कडक अंमलबजावणी करा,कामाच्या तासात वाढ करू नका,कोणत्याही क्षेत्रात निश्चितकालीन रोजगाराला मान्यता देऊ नका,कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिक्षेची कारवाई करा,बारमाही कायमस्वरुपी कामांमध्ये कंत्राटीकरणाला मज्जाव करा,सरकारी निमसरकारी सार्वजनिक उद्योग व सेवा नगरपालिका-महापालिका व खाजगी उद्योगातील वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी,हंगामी,रोजंदारी, मानधनावरील अशा अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम करा,समान व एकसारख्या कामासाठी कंत्राटी कामगारांना नियमित
कामगारांसारखे वेतन व इतर लाभ द्या,राज्याच्या राष्ट्रीय सुधारित निवृत्ती योजनेसंदर्भात तपशीलवार अधिसूचना/परिपत्रक पारित करा.
८ तासाचे कामासाठी ३०,००० रुपये किमान मासिक वेतन, १०००० रुपये मासिक पेन्शन,ईएसआय,पीएफ लागू करा,इपीएस ९५ पेन्शन धारकांना जगण्यासाठी किमान पेन्शन ₹.९००० महागाई भत्ता सहित लागू करा,सर्वांना नोकऱ्या किंवा बेरोजगार भत्ता द्या,रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलून बेरोजगारीवर नियंत्रण आणा,उद्योगांसाठीच्या प्रोत्साहन पॅकेजला रोजगार सुरक्षेशी जोडा,सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा सेवांचे खाजगीकरण थांबवा,रेल्वे,विमा व संरक्षण क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक व खाजगीकरण बंद करा,सर्व शासकीय विभागांमधील तसेच निमशासकीय क्षेत्रातील रिक्त जागांवर भरती करा,आरक्षणाची सर्व स्तरांवर अंमलबजावणी करा,खाजगी क्षेत्राला आरक्षण लागू करा,महागाई रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण,वस्तूंच्या बाजारातील सट्टेबाजीवर बंदी अशी तातडीची पावले उचला,राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या,शिक्षणाचे खाजगीकरण-बाजारीकरण बंद करा,विनाअनुदानित शिक्षण संस्थांची पद्धत,कंत्राटीकरण, मानसेवी नोकरी व तासिका पद्धत बंद करा.
आशा,गट प्रवर्तक,अंगणवाडी कर्मचारी,राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी,शालेय पोषण आहार कामगार,कृषी मित्र,ग्राम रोजगार सेवक,अंशकालीन स्त्री परिचर,कंत्राटी नर्सेस,हात पंप दुरुस्ती कर्मचारी आदी सर्व योजना कर्मचाऱ्यांचे ४५ व ४६ व्या भारतीय श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार नियमितीकरण करा.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा,रुग्णालयासहित आरोग्य सेवा,आयसीडीएस व एमडीएमएस सहित पोषण आणि शिक्षण या मूलभूत सेवांचे खाजगीकरण करण्याचे प्रस्ताव मागे घ्या,बांधकाम कामगार,घरकामगार,फेरीवाले,ऊसतोडणी,यंत्रमाग,बिडी कामगार अशा असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व किमान १०,००० रुपये पेन्शनची हमी द्द्या.
संघटना बांधणी,सामूहिक वाटाघाटी व संप,लढे करण्याच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणू नका,अर्ज केल्याच्या ४५ दिवसांच्या आत कामगार संघटनांची नोंदणी अनिवार्य करा,सर्व कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षेची हमी,स्थानिक पातळीवर लैंगिक छळ विरोधी तक्रार निवारण समित्यांचे गठन करा.
कामकाजी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व आरामकक्षांची सुविधा,सर्व कामकाजी महिलांना महिन्यांची पगारी बाळंतपणाची रजा,महिला काम करीत असलेल्या सर्व आस्थापनांमध्ये पाळणाघरांची सुविधा,समान किंवा सारखे काम करणाऱ्या महिला व पुरुषांना समान वेतन द्या.
लोकशाही व स्वातंत्र्यावर हल्ला करणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या.वरील मागण्यांसाठी हजारोच्या संख्येने आशा व गट प्रवर्तक,शालेय पोषण आहार कर्मचारी,अंगणवाडी सेविका ,मदतनीस ,कृषी मित्र,संयुक्त खदान मजदुर संघाचे कार्यकर्ते छत्री घेऊन भरपावसात हजारोच्या संख्येने कामगार कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चा मध्ये आयटक राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे ,भाकपचे जिल्हा सचिव कॉ.रवींद्र उमाटे,किसान सभा जिल्हा अध्यक्ष कॉ.प्रकाश रेड्डी,संयुक्त खदान मजदुर संघाचे नेते कॉ.एन.टी.म्हस्के, कॉ.प्रदीप चिताडे, मध्यवर्ती कर्मचारी संघटनाचे शालिक माहुलीकर, जनसेनेचे पपू देशमुख, सिटू चे कॉ.राजेश पिंजरकर,कॉ.अरुण भेलके,शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे कॉ.वनिता कुंठावार,आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना चे कॉ.निकिता निर,अंगणवाडी युनियनचे कॉ.शोभा बोगावार यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने योजना कर्मचारी,संघटित कर्मचारी व किसान ,शेतमजूर उपस्थित होते.



