Home Social सहज सुचलं नवोदितांना ठरत आहे प्रेरणादायी- चंद्रपूरच्या वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडेंनी व्यक्त...

सहज सुचलं नवोदितांना ठरत आहे प्रेरणादायी- चंद्रपूरच्या वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडेंनी व्यक्त केले मनोगत!.. 

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्धीच्या झोतात आलेला सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृप हा नवोदित तरुणींना प्रोत्साहन व प्रेरणा देणारा एकमेव गृप आहे.अश्या शब्दात चंद्रपूरच्या उच्च शिक्षित वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे यांनी आज आपले मनोगत व्यक्त केले.गेल्या ब-याच वर्षांपासून हा गृप कार्यरत असून सदरहु गृपवर महिलांची सभासद संख्या ही आज शेकडोंच्या घरात आहे.दिवसेंगणिक हा गृप लोकप्रिय होत चालला असून सभासद संख्याही तेवढ्याच वेगाने वाढत आहे.

           सहज सुचलं गृपवर मधूर व गोड आवाजाच्या चंद्रपूरच्या गायिका रश्मि हिवरे, भंडाराच्या अंजली खंडाईत -कोसुरकर , राजू-याच्या जयश्री मंगरूळकर असून सुपरिचित चित्रकार रश्मि पचारे, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक, किनवटच्या नामवंत रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांचा समावेश आहे.या शिवाय जेष्ठ लेखिका व महाराष्ट्रातील नामवंत कवयित्रीं या गृपच्या सदस्या आहेत.विशेष उल्लेखनीय बाब अशी की ह्या सर्व विविध संस्थेच्या सन्मान पुरस्कार प्राप्त आहे.

        गत काही दिवसांपासून सहज सुचलं गृपवर विदर्भातील नामवंत कवयित्री शैला चिमड्यालवार ह्या संस्कारधारा या सदरात नियमितपणे लिखाण करीत असल्याचे शिवानी झाडे यांनी यावेळी सांगितले.सहज सुचलंचा दखल हा स्तंभ लोकप्रिय ठरला आहे.या उपक्रमाची संकल्पना मुळातच नागपूरच्या मुख्य मार्गदर्शिका समाजसेविका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांची आहे.

          सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका चंद्रपूरच्या योग शिक्षिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार असून त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे झाडे यांनी म्हटले आहे.

        तदवतचं ठाण्याच्या प्रख्यात कवयित्री कु.मंगल मिसाळ, मुंबईच्या नामवंत गझलकार प्रा.सुनंदा पाटील, पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री कु.अर्चना सुतार, नागपूरच्या सुपरिचित कवयित्री प्रा.वैशाली राऊत,डॉ.स्मिता मेहेत्रे, कु.दिशा ठाकरे, नयना झाडे, मेकअप आर्टिस्ट डॉ.कल्याणी सरोदे,गडचिरोलीच्या ॲड.कविता मोहरकर, मनिषा मडावी, जेष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम,अमरावतीच्या सपना राजगूरे,राजूराच्या जेष्ठ लेखिका अधिवक्ता अंजली गुंडावार, डॉ.सूचिका बुक्कावार ,संजीवनी धांडे, सरोज हिवरे, मूलच्या पोर्णिमा किर्तीवार, पुनम मडावी समाजसेविका चंदा कामडी, अर्चना चावरे,अर्चना समर्थ,कु.प्रांजू मखरे, समता बन्सोड,फर्जना शेख , अधिवक्ता कु.हिमानी वाकुडकर,चंद्रपूरच्या ॲड.सारीका टेंभरे चंद्रपूरच्या जेष्ठ साहित्यिक सविता कोट्टी, कवयित्री वैजयंती गहुकर, मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, कविता जुमडे, मुग्धा गायकवाड, वंदना हातगांवकर,विमल काटकर, अपर्णा चिडे, माधूरी सोनटक्के, सुवर्णा लोखंडे, रजनी रणदिवे,भाग्यश्री हांडे,अंजली इटनकर, कविता दिकोंडवार, प्रविणा वाघाडे, साक्षी पोळोजवार,कु.प्रियंका गायकवाड,पुण्याच्या महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी, नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम, सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी,राणी पाल, गायत्री श्रीरामे, कु.प्रांजली दिकोंडवार,श्वेता मंडलवार, रिना तेलंग,पूजा मंगाम, जयश्री दिक्षित, प्रियंका आत्राम, ऐश्वर्या मंडाले प्रियंका ब्रेन्द्रे कवयित्रि विद्या पिंजरकर यांचे देखील कार्य उत्तम व वाखण्याजोगे असेच आहे.