रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर तालुका होमोओपॅथीक डॉक्टर संघटनेच्या वतीने रास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार चिमूर मार्फत निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्य होमोओपॅथीक डॉक्टर्स कृती समितीचे डॉ.श्यामजी हटवादे,डॉ.देवनाथ गंधारे,डॉ.प्रशांत शिवरकर,डॉ.सुभाष हलगे,डॉ.जगदीश पिसे,डॉ.प्रवीण झाडे,डॉ.केशव बांबर,डॉ.नवाज शेख,डॉ.प्रणय कुंभारे,डॉ.संजय पाटील उपस्थित होते.
तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे निवेदन पाठविणार असल्याचे शब्द निवेदनकर्त्यांना दिले.



