शुभम गजभिये..
विशेष प्रतिनिधी…
गेल्या 25 दिवसापासून शंकरपूर सब स्टेशन अंतर्गत अनेक गावांतील कृषी पंपाची लाईन बंद आहे.अनेकदा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या शेती पंपाची लाईन दुरुस्त करण्यात आली नाही.
वादळ वाऱ्यामुळे खंबे तुटल्यामुळे लाईन बंद पडली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले.अनेक शेतकऱ्यांनी तालुका काँग्रेस कमिटी चिमूर अध्यक्ष विजय पाटील गावंडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्रशासनाला घेराव घालण्याची नोटीस देण्यात आली होती.
त्यानुसार आज ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने विजय पाटील गावंडे यांचे नेतृत्वात एकत्रित येऊन शंकरपूर येथील एम.एस.ई.बी.कार्यालयाला घेराव घातला व आज संध्याकाळपर्यंत लाईन जर सुरू झाली नाही तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा ठोकू असे पत्र सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विज वितरण कंपनी मर्या.कार्यालय चिमूर तालुका उपविभागीय अभियंता संजय जळगावकर यांना निवेदन देण्यात आले.



