Home Social अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे ७ व्या स्थापना दिना निमित्ताने रामटेक विधानसभा क्षेत्रातील अध्यक्ष...

अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे ७ व्या स्थापना दिना निमित्ताने रामटेक विधानसभा क्षेत्रातील अध्यक्ष योगेश यादव यांच्या हस्ते वृक्षपुजन करून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला…

    कमलसिंह यादव 

पारशिवनी तालुका प्रतिनिधी 

पारशिवनी तालुका तील नविन गोडेगाव येथे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद,राष्ट्रीय बजरंग दल यांच्या 7 व्या स्थापना दिवसानिमित्त आज नवीन गोंडेगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांतर्गत फळझाडे, औषधी वनस्पती व छायादायक झाडांचे रोपण करण्यात आले.

         कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वृक्षपूजनाने झाली.यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद रामटेक विधानसभा अध्यक्ष योगेश यादव,अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद उपाध्यक्ष बालाशंकर मिश्रा,राष्ट्रीय बजरंग दल पारशीवणी तालुका कार्याध्यक्ष रोहित कनोजे,राष्ट्रीय बजरंग दल पारशीवणी तालुका उपाध्यक्ष दुर्गेश फुलझेले,राष्ट्रीय बजरंग दल पारशीवणी तालुका मंत्री अक्षय मस्के,राष्ट्रीय बजरंग दल गोंडेगाव अध्यक्ष अक्षय वरठी, महामंत्री अभिषेक ठाकूर,मंत्री विलास जगताप,मंत्री आर्यन फरकाडे, हनुमान चालीसा केंद्र प्रमुख श्याम शिंगणे,संपर्क प्रमुख अविनाश सायरे,अक्षय यादव,स्वप्नील सुरकार,पवन कुंभलकर,चेतक पोटभरे, आनंद मेश्राम,विक्की सोलंकी,उदय आग्रे,विजय वानखेडे,रितिक लक्षणें, रोहित कळनायके तसेच गोंडेगावचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

         यावेळी अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद रामटेक विधानसभा अध्यक्ष योगेश यादव यांनी बोलताना वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले.त्यांनी सांगितले की, “वातावरणातील बदल,वाढते तापमान व प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाने वर्षातून एक झाड लावले तर ही चळवळ यशस्वी होईल.”

           कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन राष्ट्रीय बजरंग दल पारशीवणी तालुका कार्याध्यक्ष रोहित कनोजे यांनी केले,तर आभारप्रदर्शन राष्ट्रीय बजरंग दल गोंडेगाव अध्यक्ष अक्षय वरठी यांनी केले.