Home उपक्रम तालुकातंर्गत आदिवासी समाज बांधवांसाठी विविध लाभांचे शिबिर कोलितमारा येथे संपन्न… —...

तालुकातंर्गत आदिवासी समाज बांधवांसाठी विविध लाभांचे शिबिर कोलितमारा येथे संपन्न… — ३५७ आदिवासी लाभार्थ्यांनी घेतला लाभ…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी::-. भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान आणि प्रधानमंत्री भारतीय आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत पारशिवनी तालुकाच्या आदिवासी भागात २५ जून बुधवारला सकाळी १० ते सांयकाळी ५ बाजे पर्यंत कोलितमारा येथे संतृप्त शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

        आदिवासी लोकांसाठी कोलितमारा येथे शिबिर घेण्यात आले असून, शिबिराचे उद्देश्य अनुसूचित जमातीच्या नागरिकांपर्यंत  केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजना पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

         या शिबिरां अंतर्गत मौजा कोलीतमारा येथे केंद्र शासनाचे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात श्री.प्रियेश महाजन उपविभागीय अधिकारी रामटेक यांचे मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले होते.

            श्री.सुरेश वाघचौरे तहसिलदार पारशिवनी,वन परीक्षेत्र अधिकारी कोलीतमारा, राकेश वशु तालुका कृषी अधिकारी,उपविभागीय अभियंता महावितरण पारशिवनी,वन परिक्षेत्र अधिकारी व डॉ नागपुरकर तालुका आरोग्याधिकारी,नायब तहसिलदार प्रकाश हारगुळे,नायब तहसिलदार रमेश पागोटे,पोलीस अधिकारी,तसेच संबंधित अधिकारी या शिबिराला उपस्थित होते.

          इतर विभागातील तालुका स्तरावरील अधिकारी व त्याच विभागाचे कर्मचारी यांनी सदर शिबिराच्या ठिकाणी आपल्या विभागाच्या सेवा देण्यासाठी कक्ष उभारले होते.

           त्यामध्ये संबंधीत टेवल लावून आपल्या विभागाद्वारे शासानाच्या योजनांचे फलक लावले होते.तसेच संबंधित योजनेचा लाभ संबधीत लाभार्थ्यांना देण्यात आला. सदर शिबीरामध्ये आदिवासी भागातील कोलीतमारा परिसरातंर्गत गावातील ३५७ लाभार्थी सह आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनेचा लाभ घेतला.

          धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत ३५७ लाभार्थी यानी विभिन्न योजने चे लाभ देण्यात आलेल्या योजनेच्या लाभाबाबत…आधार कार्ड ३३.,जातीचे प्रमाणपत्र २.,जॉब कार्ड ८.,रेशन कार्ड १४.,संजय गांधी व श्रावण बाळ योजना  १४.,सुकन्या समृध्दी योजना ४५.,वयक्तीक वन हक्क दावे २.,पी.एम. कीसान कार्ड ५.,वन धन विकास केंद्र १.,सौर उर्जा कनेक्शन ९,किसान क्रेडीट कार्ड २३.,सिकल सेल तपासणी २३.,हर घर नळ योजना ८.,सातबारा १५. तसेच सामान्य आरोग्य तपासणी करित १५८ असे एकुण ३५७ आदिवासी नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आलाय.