Home Maharashtra कन्हान येथे राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्या 151 व्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात...

कन्हान येथे राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्या 151 व्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी.. 

   पारशिवनी :- सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्या 151 व्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. 

      कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.देवरावजी कावळे सामाजिक कार्यकर्ता हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.गंगाधरराव अवचट,सौ.मंजू वानखेडे उपस्थित होते.

      सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांनी लोकराजा राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलित करून पूजन केले आणि पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.याचबरोबर सर्व उपस्थित सभासद आणि वाचकांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

       कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये श्री.दिनकरराव मस्के (कोषाध्यक्ष) यांनी दूरदृष्टीचा लोकराजा,सामाजिक समतेच्या पाया रचणारे द्रष्टे,जातीभेद निर्मूलन,अस्पृश्यता निवारण,स्त्रियांच्या उद्धार,बहुजनांच्या शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती,शेतीचा विकास,आरक्षणाचे प्रणेते असे लोक राजा राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्याबाबत सांगितले.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांनी राजश्री शाहु महाराज यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

       राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला वाचनालयाचे सभासद व वाचक उपस्थितीत होते.

     कार्यक्रमाचे संचालन श्री. श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.कृणाल कोल्हे यांनी केले.आभार प्रदर्शनानंतर सर्वांना अल्पोहार,मिठाई आणि फळे वितरित करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.