शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर विविध कार्यकारी सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सदैव तत्पर असून या संस्थेच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे.
चिमूर येथील सदर विविध कार्यकारी सहकारी संस्था शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे यासाठी पीक कर्ज बिन व्याजी देत असते.यंदाच्या सन २०२५-२६ या शेती सत्रात संस्थेने १४८२ शेतकरी सभासदांना १५ कोटी ४३ लक्ष ७२ हजार ६० रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असल्याची माहिती चिमूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या प्र.अध्यक्षा सौं.मनीषाताई कावरे व नवीन निवड झालेले संस्थेचे अध्यक्ष प्रशांत चिडे यांनी संयुक्तरित्या माहिती दिली.

चिमूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष सौं.मनीषाताई कावरे कार्यरत असतांना,विद्यमान अध्यक्ष हेमराजजी दांडेकर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आठ महिने प्रभारी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले.
सौं.मनीषाताई कावरे,प्रशांत चिडे यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना चेक देण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव प्रदीप बंडे उपस्थित होते.



