शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान २०२४-२५ करीता राज्याबाहेरील प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी कृषी विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली होती.
या प्रशिक्षणाकरीता जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.हे प्रशिक्षण बेंगलोर येथील कृषी विश्वविद्यालय जिकेविके येथे १९ मे ते २३ मे या कालावधीत संपन्न झाले.
शेतकऱ्यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियानातंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे प्रशिक्षणाकरीता कार्यक्रम राबविण्यात आला होता.
जिल्ह्यात मधुमक्षिका पालनाला असलेले महत्व लक्षात घेता,मधमाशा वनस्पतीच्या परगीकरणात महत्वाची भूमिका बजावतात.त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.मधाचे आयुर्वेदिक अनेक फायदे आहेत.
उत्पन्न आणि रोजगार निर्मिती,शेतकरी आणि बिगर शेतकरी कुटूंबाच्या चरितार्थाला हातभार,फलोत्पादनाच्या उत्पादनात वाढ आणणे,यासाठी मधुमक्षिका पालन उद्योगात वाढ होण्यास मदत होत.त्यामुळे मधुमक्षिकापालन काळाची गरज आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर,मुल, बल्लारपूर,भद्रावती,चिमूर,सिंदेवाही,कोरपना,पोभुर्णा,गोडपिपरी या तालुक्यातील शेतकरी हरीदास भगवान कोपूलवार,प्रभाकर पांद्वरंग बनकर,ओमप्रकाश सत्यविजय दारुडे,प्रमोद विष्णूदास सोयाम,रमेश झटीजी मुरस्कर,दत्तू नारायण येरगूडे,महेश सुरेश आस्कर,सुभाष सदाशिव आसूटकर,गौरव महादेव काकडे,मयूर विलास पारखी,नितेश वामन पाटील,दिपक श्रावण देवतळे,बोधीसत्व धनराज गेडाम,वैभव राजेंद्र गजभिये,लिलेश्वर मोहन कोसे,किशोर नामदेव धारणे,राजाराम धोंडूजी चौके,जिवन रूषी भरडे, वसंता नारायण गोणेवार,श्रीधर पांडुरंग टेकाम,शामराव कान्हू देऊरकार,नागेश नामदेव सोनूले,मुकुंदा कवडू देशमुख, एकनाथ पाल, बालकृष्ण बुग्गेवार हे २५ शेतकरी मुमक्षिका पालन प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणात कृषी विश्वविद्यालय बेंगलोर,अखिल भारतीय समन्वित मधुमाशी आणि परागकण अनुसंधान प्रायोजित मधमाशी पालन विभाग कृषी विश्वविद्यालय,जिकेविके बेंगलोर येथील डॉ.स्वेता मॅडम, डॉ.ईश्वर अप्पा,उद्योजक शिवकुमार,सुमंत,डॉ.के.टि.विजयकुमार,उद्योजक अपुर्वा,डॉ.भट,शंकर नारायण,डॉ.जगदीश,प्रसिद्ध उद्योजक श्री.प्रसाद यांनी प्रशिक्षण घेत असलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.मधमाशी हाताळणे शिक्षण दिले.
चद्रपूर जिल्ह्यातील २५ प्रशिक्षणार्थींना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.



